- News
- पॉलिटिक्स
- वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या एका उमेदवाराने प्रचारासाठी आपल्या शाळेतील शिक्षकांना जुंपल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या उमेदवाराविरुद्ध निवडणूक विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पारंपरिक प्रचाराच्या पद्धतींसोबत आता उमेदवारांनी हायटेक प्रचारात मोठी उडी घेतली आहे. भोंगे, प्रचार रॅली, सभा, बैठकांचा जोर सुरू असतानाच प्रचार थेट मोबाईल आणि सोशल मीडियावर पोहोचला आहे. मात्र या प्रचाराला आता आणखी एक वेगळे वळण मिळाले असून, एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून आरोप करणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. रांजणगाव शेणपुंजी परिसरात काही उमेदवार समर्थकांकडून एआयच्या मदतीने तयार केलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फिरत आहेत. या व्हिडिओमध्ये भूमाफिया, भ्रष्टाचारी, गैरव्यवहार अशा विषयांवर जोर देत प्रतिस्पर्ध्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळे प्रचाराचा स्तर अधिक आक्रमक बनला असून मतदारांमध्येही चर्चा रंगली आहे.
एका उमेदवाराने चक्क मोठमोठे बॅनर लावून त्यावर परिसरातील खड्डे दाखवत हाच विकास का, असा सवाल केला आहे. १५ दिवसांनी पाणी हाच विकास का?, अशा आशयाचे बॅनर लावून पाणीटंचाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आणखी एका ठिकाणी कचऱ्यांच्या ढिगाऱ्याचे फोटो लावून हीच स्वच्छता का? असा सवालही व्यक्त केला. या बॅनरबाजीचा परिणाम तात्काळ दिसून आला. बॅनरखाली असलेला कचऱ्याचा ढिगारा रातोरात साफ करण्यात आला, हे मात्र नक्की. त्यामुळे प्रचार केवळ आरोप-प्रत्यारोपापुरता मर्यादित न राहता प्रशासनालाही हालचाल करायला भाग पाडत असल्याचे चित्र आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
By City News Desk
Latest News
04 Feb 2026 22:18:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....

