आपले अपयश भाविकांच्या माथी!‌; प्रशासन म्हणते, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे दर्शन दरवाजातूनच..., निर्णयाने भाविकांत तीव्र नाराजी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर संस्थान आणि प्रशासनाने नवाच पायंडा पाडला आहे. गर्दीचे नियोजन करण्याऐवजी गाभारा बंद करून बाहेरून दरवाजातूनच भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेतला जात आहे. येणाऱ्या महाशिवरात्रीला भाविकांना गाभाऱ्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्याने भाविकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

श्री घृष्णेश्वरांचे हात लावून व डोके टेकून दर्शन भाविकांना घेता येणार नाही.  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (३ फेब्रुवारी) झालेल्या आढावा बैठकीत हा भाविकांची नाराजी ओढावून घेणारा निर्णय घेण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथे मोठी यात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर गाभारा दर्शन सुरू ठेवल्यास दर्शनासाठी ४ ते ५ तास लागतात व भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होते, असे कारण गाभारा दर्शन बंद करण्यामागे देण्यात आले आहे. योग्य नियोजन, बंदोबस्त करण्याऐवजी भाविकांना पुढे करून प्रशासन आपले अपयश भाविकांच्या खांद्यावर टाकत असल्याची चर्चा होत आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

व्हीआयपी दर्शन बंद
व्हीआयपी दर्शनही बंद राहणार आहे. गावातील नागरिकांना आधार कार्ड दाखवून पहाटे सहापर्यंत दर्शन मिळणार आहे. दर्शन रांगेतच बाहेर प्रसाद वाटप करता येईल, असे देवस्थान समितीचे उपाध्यक्ष योगेश टोपरे यांनी सांगितले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software