१८ नगरसेवकांची विरोधकांनी काढली कुंडली, सर्वाधिक १६ एमआयएमचे, अपात्रतेची कारवाई होणार?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेत निवडून आलेल्या १८ नगरसेवकांची कुंडली विरोधकांनी काढली असून, त्यांच्याविरुद्ध महापालिका प्रशासनाकडे अपात्रतेच्या तक्रार करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची सखोल चौकशी होऊन अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडे जाईल. त्यावर विभागीय आयुक्‍त सुनावणी घेऊन निर्णय घेतील. १६ तक्रारी एमआयएम नगरसेवकांच्या करण्यात आल्या असून, शिवसेना-भाजपच्या प्रत्‍येकी एकेका नगरसेवकाविरुद्ध तक्रार आहे.

सध्या महापालिका प्रशासन या तक्रारींची शहानिशा करत आहे. निवडून येताच जल्लोष केला, हारतुरे स्वीकारले, दुसरीकडे त्यांचे विरोधक त्यांची कुंडली गोळा करण्यात व्यस्त झाले होते. अलीकडेच सातारा परिसरात पुरावे गोळा करणाऱ्या विरोधकाला एमआयएम नगरसेवकाने बेदम मारहाणही केली होती. आता अशा १८ नगरसेवकांच्या तक्रारी विरोधकांनी महापालिकेकडे केल्या आहेत. एमआयएमने उमेदवारी देताना जात प्रमाणपत्र, तीन अपत्ये, अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यांचा विचारच केलेला दिसत नसल्याचे या तक्रारींवरून दिसून येते. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाणार आहे. चौकशी अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाईल. आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, की नगरसेवक दोषी आढळले तर अपात्रतेची कारवाई होईल. प्राप्त तक्रारींमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्ये, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, शपथपत्रात संपत्ती लपविणे, खोटी माहिती देणे अशा तक्रारी आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software