सिल्लोडजवळ टेम्पो-ट्रकची धडक, १२ भाविक जखमी; सोयगाव फाट्यावर जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाविकांच्या टेम्पोला भरधाव ट्रकने जोरात धडक दिली. यात १२ भाविक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगर- सिल्लोड महामार्गावर सिल्लोडजवळ मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ५ च्या सुमारास घडला. तीन रुग्णवाहिकांतून जखमींना तत्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सिन्नर (जि. नाशिक) व बिडकीन (ता. पैठण) परिसरातील काही भाविक बुलडाण्याजवळील श्री क्षेत्र जाळीचा देव येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून मंगळवारी छोटा टेम्पोने (क्र. एचएच १२ एसएफ ७९३०) परतत असताना सिल्लोड परिसरात या टेम्पोला भरधाव ट्रकने (क्र. एमएच २० एचपी ६७८६) जोरात धडक दिली. धडकेनंतर टेम्पो रस्त्यावर उलटला. अपघातानंतर ट्रक चालक तेथून पसार झाला. टेम्पोत लहान मुले व महिला असे १२ भाविक जखमी झाले. घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली आहे.

सोयगाव फाट्यावर जीपच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्‍यू
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर सोयगाव फाट्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सबदर मन्सूर तडवी (वय ५२, रा. पळसखेडा, ता. सोयगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (३ फेब्रुवारी) सकाळी दहाला घडली. तडवी हे पळसखेड्याकडून सोयगावकडे जात होते. छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या जीपशी त्यांच्या दुचाकीची धडक झाली. जीपचालकानेच तडवी यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. फर्दापूर पोलिसांनी जीपलकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस अंमलदार फिरोज तडवी, नीलेश लोखंडे यांनी पंचनामा केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software