अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वडगाव कोल्हाटीच्या यशश्री शाळेजवळ १९ वर्षीय तरुणाने शाळकरी मुलाला चाकूसारख्या वस्तूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी बोटचेपी भूमिका घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मुलगा अल्पवयीन असताना आणि संपूर्ण घटना नजरेखालून घातली असता तिचे गांभीर्य अधिक असल्याचे लक्षात येते. तरीही पोलिसांनी संशयिताविरुद्ध कठोर भूमिका घेतलेली नाही. योगेश अशोक शिंदे (वय १९, रा. वडगाव कोल्हाटी) असे संशयिताचे नाव आहे.

नक्की काय घडलं...
मुलाच्या पालकांच्या आरोपानुसार, आज, ४ फेब्रुवारीला दुपारी १२ च्या सुमारास यशश्री शाळेजवळून अल्पवयीन मुलगा जात होता. योगेश व त्याच्या दोन साथीदारांनी त्याचा पाठलाग करत मोटारसायकलीचा धक्का दिला. तो गेल्या २० दिवसांपासून सतत पाठलाग करत असल्याचे मुलाचे म्हणणे आहे. मात्र आज थेट चाकूसारखे शस्‍त्र दाखवून मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुलाने तिथून पळ काढत शाळेत आश्रय घेतला. त्यावेळी संशयिताने शिक्षिकेलाही धमकावत मुलाला बाहेर काढण्यास सांगितले. मात्र शिक्षिकेने तसे केले नाही. त्यानंतर मुलाने हेल्पलाइन ११२ वर मदत मागितली. पोलीस लगेचच घटनास्थळी आले. त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software