छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात : भरधाव ऑटोरिक्षा नादुरुस्त टेम्पोला धडकली, २ ठार, २ गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रवाशी घेऊन छत्रपती संभाजीनगरहून वाळूज एमआयडीसीकडे निघालेल्या ऑटोरिक्षाची नादुरुस्त टेम्पोला धडक बसली. यात रिक्षाचालकासह प्रवासी महिलेचा जागीच मृत्‍यू झाला. दोन प्रवासी तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर रस्‍त्‍यावरील ए. एस. क्लबजवळ आज, ३ फेब्रुवारीला पहाटे दोनच्या सुमारास घडला.

धडक इतकी जोरात होती, की रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. रिक्षात अडकलेल्यांना अग्निशमन दलाने रेस्क्यू करून बाहेर काढले. गंभीर जखमी आणि मृतक वाळूज एमआयडी परिसरातील रांजणगाव शेणपुंजीचे आहेत. मृतकांत रिक्षाचालक रईस हासिम शेख (वय ३५) आणि रुक्मिणी येणगे (वय ४५) यांचा समावेश आहे, तर शीतल मोरे (वय २४) व पायल वरदे (वय १९) या तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

अग्निशमन दलाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, चालक रईस रिक्षाच्या पत्रात पूर्णपणे अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रिक्षाचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढले आणि तातडीने घाटी रुग्णालयात हलवले. जखमी तरुणींची प्रकृती चिंताजनक आहे. मदतकार्य मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी दीपराज गंगावणे आणि संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, छत्रपती केकान, जगदीश गायकवाड, अमिताभ कराड आणि वाहन चालक चंद्रसेन गीते यांच्या पथकाने केले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!

Latest News

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न! पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात : भरधाव ऑटोरिक्षा नादुरुस्त टेम्पोला धडकली, २ ठार, २ गंभीर जखमी
मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरची घटना
राठोड, काळे, चव्हाण अन्‌ मुलतानी... सोयगावच्या दोन गटांत रंगली राजकीय वारसांमध्ये लढाई!; मतदार कोणाच्या पाठिशी राहणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software