वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. आरोप-प्रत्‍यारोप तर होतच आहेत, पण प्रचारासाठी वेगळी वाटही निवडली जात आहे. यातून प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे. राज्‍याच्या सत्तेतील दोन भागीदार पक्षांच्या उमेदवारांमुळे वाळूज एमआयडीसी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

या गटात शिंदे गटाचे हनुमान भोंडवे, भाजप पुरस्कृत अपक्ष सचिन गरड रिंगणात आहेत. नेत्‍यांच्या प्रचार सभा झाल्यानंतर मतदानाची तारीख जस जशी जवळ येत आहे, तसे वैयक्‍तीक पातळीवर जाऊन आरोप-प्रत्‍यारोप करत प्रचार केला जात आहे. एका उमेदवाराच्या प्रचारासाठी शिक्षिका मैदानात उतरल्याचे पाहून दुसऱ्या उमेदवाराने समर्थक, कार्यकर्त्यांसह जाऊन त्यांना रोखले. ज्ञानदानाचे कर्तव्य सोडून ‘शाळा’ बुडवून सुरू असलेला हा उद्योग पाहून त्यांनी महिला शिक्षिकांना जाब विचारला. त्यावर शिक्षिकांनी अजब दावे केल्याचे पहायला मिळाले. आमच्या संस्थेची परवानगी घेऊन प्रचारासाठी स्वेच्छेने सहभागी झालो असल्याचे शिक्षिकांचे म्हणणे होते.

शाळेला ‘बुट्टी’ मारून शिक्षक एखाद्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे पाहून उमेदवार आणि त्‍यांच्या कार्यकर्त्यांचा संताप झाला. नोकऱ्या सोडा, राजकारणात या, असा सल्लाही या कार्यकर्त्यांनी या शिक्षिकांना दिला. त्यावर शिक्षिकांनी पोलिसांत धाव घेऊन आम्हाला दमदाटी केली. एकेरी भाषेत शिवीगाळ केली, असे आरोप केले आहेत. आपल्या संस्थेच्या शिक्षिकांना, आपल्या प्रचारासाठी रोखले म्हणून संतापलेल्या उमेदवारानेही समोरच्या उमेदवाराची पोलिसांत तक्रार केली आहे. समोरचा उमेदवार व त्‍याचे समर्थक आम्हाला दमदाटी करत आहेत. आम्हाला धोका निर्माण झाला आहे, असा सूर आळवला आहे. मतदानाला अवघे ३ दिवस बाकी आहेत. त्यामुळे दोघांच्या या राड्याला कसे आवरायचे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software