‘घर-घर की कहानी’ बदलली मृत्यूत : सुनेने हाताची नस कापताच जबर धक्का बसून सासूचा मृत्यू!, बीड बायपास भागातील घटनेने शहर हादरले!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सासू-सुनेच्या भांडणात सुनेने स्वतःच्या हाताची नस कापून घेतल्याने रक्तबंबाळ सुनेला पाहून ७६ वर्षीय सासू जागीच कोसळली आणि मृत्युमुखी पडली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (३ फेब्रुवारी) सकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीड बायपास भागात घडली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बीड बायपास भागातील रहिवासी अमोल (नाव बदलले आहे) खासगी कंपनीत नोकरीला असून, मंगळवारी सकाळी ते कामावर गेले. त्यांची दोन मुलेही शाळेत गेली. घरात ४२ वर्षीय सून व ७६ वर्षीय सासूच होती. कौटुंबिक कारणावरून दोघींत वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्याने संतापून सुनेने डाव्या हाताची नस कापून घेतली. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन ती बेशुद्ध पडली. आक्रोश आणि आरडाओरड ऐकू आल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. याचवेळी रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या सुनेला पाहून सासूलाही धक्का बसला आणि त्याही कोसळल्या. घराचा दरवाजा आतून बंद होता. मदतीला आलेल्या नागरिकांनी गॅलरीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

सासूला घाटी रुग्णालयात तर सुनेला बीड बायपास भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र सासूला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. सूनही ब्लेडचा वार खोलवर गेल्याने गंभीर जखमी असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली आणि शेजाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. सासूला घाटी रुग्णालयात दाखल करताना मारहाण हे कारण नमूद करण्यात आले होते. त्यामुळे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सायंकाळी अहवालात सासूचा मृत्यू ‘डेथ ड्यू टू शॉक' असल्याचे निष्पन्न झाले. समोरील दृश्य पाहून त्यांना जबर धक्का बसला आणि त्या क्षणातच कोसळून मृत्‍यूमुखी पडल्या. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software