- News
- सिटी हेडलाइन्स
सिटी हेडलाइन्स
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी (१३ मार्च) दुपारी पावणेचारला छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयासमोर पकडले. गायींची सुटका करत टेम्पो जप्त केला आहे. या कत्तलीसाठी नेण्यात...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत घराबाहेर हाकलून दिल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेने छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी...
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या सुमारास घडली. मुलीच्या आईने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे....
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
Published On
By City News Desk
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सुमारे २० फूट खोल पाटाच्या चारीत कोसळली. एअरबॅग उघडल्याने कार चालवत असलेले मुख्याध्यापक देविदास मारोती चितळे (वय ४०, रा. छत्रपती संभाजीनगर) वाचले. ते जखमी झाले आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड महामार्गावरील...
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानकाजवळील नाश्ता सेंटरवर काम करणाऱ्या २ तरुणांवर जुन्या भांडणाच्या कारणावरून रिक्षाचालकासह चौघांनी हल्ला केला. चाकूने, दगडाने डोक्यात मारून जखमी केले. ही घटना बुधवारी (११ मार्च) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चौघांविरुद्ध...
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुसऱ्या वाहनाने हूल दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी थेट दुभाजकावर धडकली. यात हिरालाल गोपीचंद साळुंके (वय ५०, रा. भांबर्डा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (१४ मार्च) दुपारी करमाडजवळील लाडसावंगी मार्गावर...
घर का भेदी... मनपा रुग्णालयाचा कंत्राटी कर्मचारीच गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सक्रीय!; सिडको MIDC पोलिसांनी केली अटक, टोळीप्रमुख डॉ. सोनवणे अद्याप फरारीच
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेट चालवणाऱ्या टोळीची पाळेमुळे खोदणे सध्या सिडको एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. शनिवारी (१४ मार्च) महापालिका रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी शंकर आढाव (वय २७) याला अटक केली आहे. तो महापालिका रुग्णालयात नियमित...
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात. मुलींशी लग्न करून त्यांना नंतर विकण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबवण्यासाठी कडक कायदा हवा. एखाद्या हिंदू मुलीने परधर्मीय मुलाशी लग्न केले, तर त्या मुलीचा आणि होणाऱ्या...
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हडको एन १२ मधील प्रसिद्ध सत्यविष्णू हॉस्पिटलचे डॉ. इफ्तेखार गफ्फार पटेल (वय ५२, रा. हडको एन १२) यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या मुसक्या सिटी चौक पोलिसांनी शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी साडेदहाच्या...
समोर पोलीस चेकिंग सुरू आहे म्हणत दोन भामट्यांचा वृद्धाला गंडा!; २ तोळ्यांची सोनसाखळी घेऊन पसार...
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : समोर पोलीस चेकिंग सुरू असल्याची बतावणी करून ६३ वर्षीय व्यापाऱ्याच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी दोन भामट्यांनी काढून घेतली आणि पोबारा केला. ही धक्कादायक घटना वाळूज महानगरमध्ये शुक्रवारी (१३ मार्च) दुपारी १ च्या सुमारास घडली....
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जुन्या प्रेमप्रकरणाच्या धुसफुसीतून तरुणाला लोखंडी रॉड, बेल्टसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना जुना मोंढा रोहिदासपुरा येथे बुधवारी (११ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जिन्सी पोलिसांनी हल्लेखोर ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
Published On
By City News Desk
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेंद्रा एमआयडीसीजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर प्रकल्प साकारणार असल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे. या माहितीला एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकारीक सूत्रांनी पुष्टी केली असून, या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच जयपूर...

