अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कंपनीत एकत्र काम करताना ओळख झालेल्या आणि घराजवळ राहत असल्याने मैत्री होऊन नंतर जवळीक वाढलेल्या २६ वर्षीय विवाहित तरुणीला त्याने वाळूज एमआयडीसीतून पळवून नेले. तुळजापूर, अहिल्यानगर, कर्जत आणि नंतर खुलताबाद तालुक्यातील कान्होबा वडोद... असा प्रवास करत हे युगुल २० दिवसांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अवतरले. यादरम्याच्या काळात त्याने आपल्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तरुणीने प्रियकरावर लावला आहे. त्यामुळे प्रियकर आता कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकला आहे.

गिरजाराम बबन पवार (वय २७, रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज एमआयडीसी परिसर) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार तरुणी मूळची फुलंब्री तालुक्यातील रहिवासी असून, सध्या पतीसोबत वाळूज एमआयडीसी परिसरातील कमळापूर फाटा परिसरात राहते. तक्रारीनुसार, तिचे पती खासगी कंपनीत काम करतात. तीसुद्धा कंपनीत कामाला जाते. गिरजारामसोबत तिची १ वर्षापासून ओळख आहे. तो तिच्या घराशेजारीच राहतो. दोघे एका कंपनीत कामाला होते. तिथेच ओळख झाली. ओळख वाढून जवळीक निर्माण झाली. अलीकडच्या काळात तरुणीने तेथील काम सोडून देत दुसरीकडे नवे काम शोधायला सुरुवात केली होती.

गेल्या २ जानेवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास एका कंपनीत काम शोधण्यासाठी जात असताना गिरजाराम भेटला. त्याने सोबत चल. तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणी घाबरून गेली. तो तिला घेऊन बसस्थानकावर गेला. तिथून दोघे तुळजापूरला गेले. दोघे ११ जानेवारीपर्यंत तुळजापूरला देवीच्या मंदिराच्या बाजूला किरायाने रूम घेऊन राहत होते. घाबरून गेल्याने कोणाची मदत घेतली नाही, असा दावा तरुणीने केला. मधल्या काळात एकेदिवशी गिरजारामच्या मोबाइलवरून तिने तिच्या वडिलांना कॉल केला होता. मात्र गिरजारामने मोबाइल हातातून हिसकावून घेतला व पुन्हा पतीला व वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नंतर कोणाला कॉल केला नाही व त्याच्यासोबत राहिली, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तुळजापूरहून दोघे अहिल्यानगरला गेले. तिथून कर्जतला गेले. त्यानंतर १२ जानेवारीला तिथून गिरजारामने त्याच्या बहिणीकडे कान्होबा वडोद (ता. खुलताबाद) याठिकाणी नेले. त्या ठिकाणी गिरजारामने तरुणीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खुलताबाद तालुक्यातीलच दुसऱ्या बहिणीकडे घेऊन गेला...

पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार...
इकडे ज्या दिवशी पत्नी बेपत्ता झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणीच्या पतीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती. पोलीस तरुणीचा शोध घेत होते. तपासात गिरजारामनेच तिला पळवून नेल्याचे समोर आले. मोबाइल लोकेशन, संपर्कातील व्यक्ती, संभाव्य ठिकाणे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस दोघांचा कसोशीने शोध घेत होते. २० दिवस उलटून चालले तरी पत्नीचा शोध लागत नसल्याने पती चिंताग्रस्त होता. याच दरम्यान पोलिसांनी गिरजारामच्या भाऊजीला कॉल केला होता. आपणच तरुणीला पळवल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याचे कळल्याने गिरजारामचे धाबे दणाणले. त्यानंतर तो तिला घेऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आला. मात्र आणताना त्याने धमकी दिली, की तू तिथे जाऊन मी तुला पळवून नेले असे सांगू नको..., असे तरुणीने म्हटले असून, तिने गिरजारामविरुद्ध तक्रार दिली. गिरजारामने पतीला जीवे मारण्याची धमकी देत तिला पळवून नेले आणि जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्वास
पोलिसांनी जवळपास २० विविध ठिकाणी तपास केल्यानंतर तरुणी आणि गिरजाराम पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनैतिक संबंधातून दोघे पळून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र तरुणीने गिरजारामविरुद्ध तक्रार दिल्याने तो आता चांगलाच कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. अधिक तपास पोलीस करत असून घटनाक्रमातील सर्व बाबींची सत्यता तपासली जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software