सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post


छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उस्मानपुऱ्यातील एका वृद्ध दाम्‍पत्‍याच्या घरातून १३ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस गायब झाला आहे. कपाटात ठेवलेला होता. पूर्ण घर शोधले, बँकेचे लॉकरही तपासले, पण २ लाखांचा हा नेकलेस गेला तर कुठे गेला, असा प्रश्न दाम्‍पत्‍याला पडला आहे. मोलकरणीला विचारले तर तिच्या पतीने घरी येऊन दाम्‍पत्‍याला धमकावले... अखेर वृद्धाने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी) चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

विजयकुमार बबनराव शाहीर (वय ६२, रा. सिटी केअर हॉस्पिटलसमोर, उस्मानपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले असून, ते बाहेरगावी असतात. घरी विजयकुमार आणि त्यांच्या पत्नीच राहतात. गेल्या १ डिसेंबरपासून त्यांच्याकडे एक युवती घरकामाला येत होती. ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ला विजयकुमार यांच्या पत्नीला सूनेचा कॉल आला. सून म्हणाली, की मी मकरसंक्रांतसाठी घरी येणार आहे. मला तुमचा सोन्याचा नेकलेस घालायचा आहे. त्यावर विजयकुमार यांच्या पत्नीने हो सांगितले. नंतर त्या घरात नेकलेस बघायला गेल्या असता छोट्या लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये नेकलेस दिसून आला नाही. पूर्ण घरात शोध घेतला तरी नेकलेस मिळाला नाही.

२२ डिसेंबर २०२५ रोजी घड्याळ शोधत असताना विजयकुमार यांच्या मुलाने नेकलेस बघितला होता. १३ जानेवारीला विजयकुमार यांच्या पत्नी व सून बँकेच्या लॉकरमध्ये नेकलेस ठेवलाय का हे पहायला गेल्या. पण लॉकरमध्येही नेकलेस नव्हता. त्यामुळे नेकलेसबद्दल विजयकुमार आणि त्यांच्या पत्नीने मोलकरणीला विचारणा केली. मोलकरणीने ही बाब तिच्या पतीला सांगितली, तेव्हा तिच्या पतीने येऊन विजयकुमार यांना माझ्या पत्नीवर चोरीचा संशय घेता म्हणून तुमच्याविरुद्ध तक्रार करेल, अशी धमकी दिली. आजपर्यंत शोध घेऊनही नेकलेस मिळून न आल्याने अखेर विजयकुमार यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान जगताप करत आहेत. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software