- News
- पॉलिटिक्स
- मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरची घटना
मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरची घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मंत्र्यांच्या हवाई दौऱ्यांबद्दल विशेष काळजी घेतली जात आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या मर्सिडीज कारचे दोन्ही टायर फुटल्याची घटना सांगून कार्यकर्त्यांची धडधड वाढवली होती. आता मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. त्यामुळे पंकजाताईंच्या समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मराठवाड्यात ठिकठिकाणी सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरात त्यांनी सोमवारी (२ फेब्रुवारी) रात्री सभा घेतली. आज, ३ जानेवारीला त्यांचा लातूरचा दौरा आहे. प्रचार दौऱ्यात जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. सकाळी विमानतळावरून लातूरकडे रवाना होण्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेचच उड्डाण थांबवले. बिघाडाच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास होऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले.
बजाजनगरच्या सभेत म्हणाल्या...
बजाजनगरच्या सभेत भाषण करताना पंकजा मुंडे यांनी म्हटले होते, की मी हेलिकॉप्टरने प्रवास करते हे आईला माहीत आहे. त्यामुळे मी प्रवास करत असताना माझी आई देव पाण्यात ठेवते... त्यांच्या या भावनिक विधानाची चर्चा आजच्या घटनेने होऊ लागली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
By City News Desk
Latest News
03 Feb 2026 18:34:06
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...

