पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील सक्रियता अचानक वाढली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दानवे खा. संदीपान भुमरे आणि त्यांचे चिरंजीव आ. विलास भुमरे यांचे तालुक्यातील वर्चस्व मोडीत काढण्याच्या प्रयत्नात असून, यात दानवे यांना किती यश मिळते, याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पैठण शहर आणि तालुक्यातील राजकारणावर भुमरे यांची मजबूत पकड असून, हे वर्चस्व त्यांनी गेल्या ३५ वर्षांपासून अबाधित ठेवले आहे. अनेकदा प्रयत्न करूनही हे वर्चस्व मोडीत काढण्यात अनेक नेत्यांना अपयश आले आहे. पैठण तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असला तरी लोकसभा निवडणुकीत या तालुक्यातील मतदान जालना लोकसभा मतदारसंघात येते. गेल्या निवडणुकीत दानवे यांना तालुक्याने काही अंशी धक्का दिला होता. हे भुमरे यांच्यामुळे घडल्याचा राग दानवे यांच्या मनात आहे. यातूनच आता याचे उट्टे काढण्याची संधी दानवे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शोधत असल्याची चर्चा आहे. पैठण तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट आणि पंचायत समितीचे १८ गण आहेत. यंदा या निवडणुकीत सर्वच ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार उभे आहेत.

दानवे यांनी या निवडणुकीत लक्ष घालून तालुक्यातील भुमरे विरोधकांना बळ देणे सुरू केल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत स्वतः खा. भुमरे हेही लक्ष घालत असले तरी त्यांचे उमेदवार निवडून येणार नाहीत, यासाठी दानवे विशेष प्रयत्न करीत असल्याचे बोलले जाते. त्याचवेळी भुमरे यांचे कट्टर विरोधक असलेले माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यावेळी भाजपमध्ये आल्यानंतर आता दानवे यांचे बळ त्यांच्या पाठीशी असले तरी दरवेळी भुमरे यांना साहाय्य करणारे भाजप कार्यकर्ते या वेळी आपल्याच उमेदवारांना किती मदत करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

उद्धव गटाची घायाळांवर मदार 
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने जिला परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची जबाबदारी उपनेते सचिन घायाळ यांच्यावर सोपविली आहे. घायाळ यांना आतापर्यंत भुमरे यांचे वर्चस्व कधीही मोडीत काढता आलेले नाही. मात्र, यावेळी ते यात यशस्वी ठरतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software