विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नोव्हेंबर/ डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एकूण १२६ निकालांपैकी ५८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा तसेच मूल्याकंन प्रक्रिया राबविण्यात आली. या सर्व ५८ अभ्यासक्रमांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करण्यात आले आहेत. यात पदवी अभ्यासक्रमांचे - १८, एम. ए. अभ्यासक्रमाचे - २१, एम.एस्सी. अभ्यासक्रमाचे - १२, बीएड, एमएड, बीपीएड आणि एमपीएड -४, विधि अभ्यासक्रमांचे - ०२, फार्म डी - १ असे एकूण ५८ निकाल जाहीर करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी संलग्नित महाविद्यालयांत अथवा स्वतःच्या लॉगिनमध्ये निकाल पहावा, असेही डॉ. डोळे यांनी कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software