राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज

जयपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ताप, अस्वस्थता जाणवू लागल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १० मार्चला जयपूर येथील सवाई मानसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने बुधवारी (११ मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची बुधवारी पुन्हा...
सिटी हेडलाइन्स  पॉलिटिक्‍स  राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील ब्रिजवाडी येथील सर्वे क्र.१, गट क्र. ३० मधील क्षेत्रफळ ५४ एकर ३० गुंठे या कोट्यवधी रुपयांच्या जमीन-खरेदी विक्री प्रकरणात विभागीय आयुक्‍त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नाव, शिक्क्यांचा वापर करून बनावट आदेश काढण्यात आल्याची...
सिटी हेडलाइन्स  राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

छत्रपती संभाजीनगरचे उदयोन्मुख नेमबाज संभाजी झनझन यांचा अपघाती मृत्यू!, क्रीडा क्षेत्रात हळहळ

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील उदयोन्मुख नेमबाज संभाजी झनझन (वय २७, रा. पारिजातनगर) यांचे सोमवारी (९ फेब्रुवारी) सकाळी १०:३० च्या सुमारास पालघर जिल्ह्यात अपघाती निधन झाले. ते महापालिकेतील निवृत्त अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांचे चिरंजीव होत....
सिटी हेडलाइन्स  राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

चोर तो चोर अन्‌‍ वर शिरजोर... मानहानी केल्याचा पोलिसांवर ठोकला दावा!

बर्लिन (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चोर तो चोर अन्‌‍ वर शिरजोर अशी एक म्हण आहे. ही म्हण जर्मनीच्या एका चोराच्या बाबतीत खरी ठरली असून, आचेन शहरातील एका प्रसिद्ध बँकेत चोरी करणाऱ्या चोराने पोलिसांवर अटकेनंतर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे....
राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

महाराष्ट्र पुन्हा हादरला : बदलापुरात ४ वर्षीय चिमुकलीवर स्‍कूलव्हॅन चालकाकडून लैंगिक अत्याचार!

ठाणे (मेट्रोपोलिस वृत्तसेवा) : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पश्चिम परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या चार वर्षीय मुलीवर तिच्या स्‍कूल व्हॅन चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असून, यावेळी त्या मुलीला मारहाणदेखील करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या...
राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

जम्मू- काश्मिरात मोठी दुर्घटना; लष्कराचे वाहन दरीत कोसळून १० जवान शहीद; ११ गंभीर जखमी

उधमपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला. हे वाहन दोनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १० जवान शहीद झाले. या अपघातात ११ जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना विमानाने उधमपूर...
राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप

तुळजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापुरातील तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलात आणि जाणार पण करताना दानपेटीत चुकून आपली काही वस्तू पडली तर ती दान म्हणून सोडून द्यावी लागणार आहे. कारण तुळजाभवानी मंदिर संस्थानने तसा फतवाच जारी केला आहे....
राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

ओवेसींचा एमआयएम निवडणूक समीकरणे कसे बदलत आहे?

मुंबई (कल्याणी पाटील : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) हा पक्ष बराच काळ जुन्या हैदराबाद शहरापुरता मर्यादित होता. हा पक्ष आता त्याच्या पारंपरिक पायाच्या पलीकडे विस्तारत आहे आणि अनेक राज्यांमध्ये अल्पसंख्याक-केंद्रित राजकीय...
एक्‍सक्‍लुझिव्‍ह  राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

धर्माने भारत चालेल तोपर्यंत राहील "विश्वगुरू’!; आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी असे का म्हटले..?

भारताला पूर्वजांकडून समृद्ध आध्यात्मिक वारसा मिळाला आहे आणि संत आणि ऋषींचे मार्गदर्शन मिळत आहे. जोपर्यंत असा धर्म भारताचे मार्गदर्शन करत राहील, तोपर्यंत भारत "विश्वगुरू’ राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी केले. आरएसएस प्रमुख म्हणाले, की...
राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

छत्रपती संभाजीनगरसह १२ जिल्हा परिषदांची ५ फेब्रुवारीला निवडणूक, ७ फेब्रुवारीला मतमोजणी

मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात अखेर बहुप्रतिक्षीत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक ५ फेब्रुवारीला...
सिटी हेडलाइन्स  राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या मारेकऱ्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये हार्टॲटॅकने मृत्‍यू, हर्सूल कारागृहात भोगत होता जन्मठेप

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या खंडणीच्या मागणीवरून अंडरवर्ल्डने घडवून आणली होती. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड, कुख्यात शूटर अब्दुल...
सिटी क्राईम  सिटी डायरी  सिटी हेडलाइन्स  राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल 

छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांचा दिल्लीत गौरव; सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल, कोण आहेत रमेश अण्णा मुळे जाणून घेऊ...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. दिल्लीत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकोत्तर जन्मजयंतीनिमित्त ३ जानेवारीला आयोजित विशेष कार्यक्रमात श्री. मुळे यांचा सन्मान करण्यात आला....
राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल