भाजपची शहर कार्यकारिणी, कोअर कमिटीतील ५ जणांच्या निकटवर्तीयांचाच भरणा!, संधी न मिळालेल्यांची उफाळली नाराजी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (१२ ऑगस्ट) शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. ज्‍यांना पदे मिळाली नाहीत, त्‍यांनी निवडीवर प्रश्न निर्माण केले आहे. त्‍यांच्या मते, या कार्यकारिणीवर नेते आणि मंत्र्यांची छाप आहे. त्‍यामुळे गटबाजीला उफाळून येईल.

शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी कार्यकारिणी सर्वसमावेशक असल्याचे म्हटले असले, तरी एकाच राजकीय घरात दोन-दोन पदे गेल्याचेही समोर आले आहे. खा.डॉ. भागवत कराड यांच्या घरात सरचिटणीस आणि महिला मोर्चा शहराध्यक्ष पद गेले आहे. पक्षाची स्थानिक पाच जणांची कोअर कमिटी असून, त्यात अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, शिरीष बोराळकर व किशोर शितोळे यांचा समावेश आहे. त्‍यामुळे शहर कार्यकारिणीवर या नेत्‍यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांचाच भरणा आहे.

कोण आहेत कार्यकारिणीत?
सरचिटणीस : ताराचंद गायकवाड, हर्षवर्धन कराड, रामेश्वर भादवे, छाया खाजेकर, महिला मोर्चा अध्यक्ष : डॉ. उज्ज्वला दहीफळे, युवा मोर्चा अध्यक्ष : राहुल दांडगे, कोषाध्यक्ष : संजय खनाळे. उपाध्यक्ष : गोविंद्र केंद्रे, जालिंदर शेंडगे, दीपक ढाकणे, महेश माळवतकर, शिवाजी दांडगे, संजय जोशी, जयश्री किवळेकर, सुरेंद्र कुलकर्णी, संजय चौधरी, अरविंद डोणगावकर, अरुण पालवे, मनीषा भन्साळी, शंकर म्हात्रे, अमित देशपांडे, प्रशांत भदाणे, राजू बागडे. सचिव : प्रवीण कुलकर्णी, सिद्धार्थ साळवे, नितीन खरात, प्रदीप बुरांडे, नंदलाल गवळी, रूपाली वाहुळे, विवेक राठोड, अशोक जगधने, सागर पाले, अमित लोखंडे, कल्याण धुळे, गीता आचार्य, मीना खरे, अजय शिंदे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software