पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवारी (१५ जुलै) सकाळी ९ वा. ५ मि. नी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.

या सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते,  विद्यार्थी, अधिकारी- कर्मचारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

घरोघरी राबवा ‘हर घर तिरंगा अभियान’; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन
देशभक्तीचे उत्साहपूर्ण वातावरण असून त्यात घरोघरी हर घर तिरंगा हे अभियान राबवा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. यासंदर्भात आज, १३ ऑगस्टला जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यालये, आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याशी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा श्रीमती संगिता राठोड. एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी मुख्यालयातून सहभागी झाले होते. श्रीमती राठोड यांनी अभियान राबविण्याची कार्यपद्धती सांगितली. आपापल्या गाव, शहरात या अभियानात लोकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, अभियानाची छायाचित्रे केंद्र शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावी, असेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software