बाफना ज्वेलर्ससमोर राडा : इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या चौघांचा स्कुटीचालकावर हल्ला, अपहरणाचा प्रयत्‍न..., असा आहे त्‍या कारचा नंबर...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गुन्ह्यांचे प्रमाण पार टोकाला पोहोचले आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून झालेला वादही जिवावर बेतू शकतो. जालना रोडवरील बाफना ज्‍वेलर्ससमोर इनोव्हा क्रिस्टा कारमधून उतरलेल्या पाच जणांनी एका स्‍कुटीचालकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. त्‍याला कारमध्ये टाकून नेण्याचा प्रयत्‍न केला. ही धक्कादायक घटना ८ ऑगस्टच्या रात्री ११ च्या सुमारास घडली. सोमवारी (११ ऑगस्‍ट) या प्रकरणात स्‍कुटीचालकाने तक्रार दिली. त्‍यावरून जिन्सी पोलिसांनी ५ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कार्तिकेय राजेस मधेकर (वय २६, रा. न्यू इंदिरानगर बायजीपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते बीड बायपासवरील गुरुप्रसाद लॉन्सजवळील गुरुप्रसाद मेडीकल स्टोअरमध्ये काम करतात. ८ ऑगस्टला रात्री ११ वाजता ते मध्यवर्ती बसस्थानकाकडून इलेक्‍ट्रिक स्कुटीने (MH20 HC 4724 EVA) आकाशवाणीमार्गे पुंडलिकनगर येथे जात असताना बाफना ज्वेलर्सच्या बाजूला प्रिया स्वीटजवळ अचानक इनोव्हा क्रिस्टा कार (MH 20 EY0333) रिव्हर्स घेत आली. कारचा मधेकर यांना धक्का लागता लागता वाचला. त्‍यावरून त्‍यांनी कारचालकाला सांगितले, की वाहता रोड आहे, जरा गाडी हळूने मागे घे... नंतर मधेकर हे तिथून पुढे निघाले. त्‍याचवेळी इनोव्हा क्रिस्टा कार मधेकर यांच्या मागून आली. प्रिया स्वीटजवळ येऊन मधेकर यांना कारने अडवले. गाडीत मागे बसलेल्याने मधेकर यांना नाव विचारले आणि कारचालक व त्याच्यासोबत असलेल्या चार अनोळखी व्यक्‍तींनी कारमधून उतरून शिवीगाळ करत मधेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्‍यांनी मधेकर यांची स्कुटी खाली पाडली व स्कुटीचे नुकसान केले. कारममधील एक जण म्हणाला, की चलो रे इसको उठाके गाडी मे डालो... त्यानंतर सर्वांनी मधेकर यांना धरून गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. मधेकर यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी ते चारही जण कारमध्ये बसून सेव्हन हिलच्या दिशेने निघून गेले. गाडीत बसताना ते म्हणाले, की तू अभी तो बच गया, नही तो तेरे को जान से मार देते, असे म्हणून धमकी देत निघून गेले. मधेकर यांनी डायल ११२ ला कॉल केला. जिन्सी पोलीस लगेचच घटनास्‍थळी आले. त्‍यांनी मधेकर यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.  अधिक तपास अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!

Latest News

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे! शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...
पैठणमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर!; तब्‍बल २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी!!
छ. संभाजीनगरात चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांवर कारवाई; साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली हॉटेलचालकांची बैठक, म्हणाले, अल्पफायद्यासाठी कुणाच्या आरोग्याशी खेळू नका!
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software