भल्या पहाटे लोटाकारंजा येथे चोरट्याने दाखवली करामत, तरुणाची पोलिसांत धाव

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लोटाकारंजा येथे घरात घुसून चोरट्याने ८० हजारांची चोरी केली. जाताना बाहेरून कडी लावून गेला. ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्‍ट) पहाटे घडली. सिटी चौक पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजेश सुभाष नरवडे (वय २३, रा. लोटाकारंजा) या तरुणाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो आई, वडिलांसह राहतो. खासगी नोकरी करतो. त्‍याची आई मनपात सफाई कामगार आहे. रक्षाबंधन सणामुळे त्‍याची बहीण सोनाली नरेश काकळीस दोन दिवसांपासून त्‍यांच्याकडे आली आहे. मंगळवारी (१२ ऑगस्‍ट) पहाटे साडेपाचच्या सुमारास राजेश नेहमीप्रमाणे आईला मनपाच्या सफाई कामासाठी रोशनगेट, छत्रपती संभाजीनगर येथे मोटारसायकलीने सोडून घरी आला व घरात झोपी गेला. त्‍यावेळी घरात तिचे वडील व बहीण झोपलेले होते.

सकाळी ९ ला सर्व जण झोपेतून उठले. घराची कडी बाहेरून लावलेली होती. उशीजवळ ठेवलेला राजेशचा आयफोन दिसून आला नाही. बहीण सोनालीची उशीजवळ ठेवलेली सोन्याची पोतही गायब होती. फ्रिजवर टॉवेलखाली ठेवलेले २० हजार रुपयेसुद्धा दिसले नाहीत. आयफोन, सोन्याची पोत, २० हजार रुपये रोख कुणीतरी चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार राजेशने सिटी चौक पोलीस ठाण्यात केली आहे. ३० हजारांचा आयफोन, ३० हजारांची सहा ग्रॅमची सोन्याची पोत आणि २० हजार रुपये रोख चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार काशिनाथ भावळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!

Latest News

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे! शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...
पैठणमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर!; तब्‍बल २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी!!
छ. संभाजीनगरात चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांवर कारवाई; साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली हॉटेलचालकांची बैठक, म्हणाले, अल्पफायद्यासाठी कुणाच्या आरोग्याशी खेळू नका!
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software