अबब... देवगाव रंगारीत टोमॅटोला मिळाला ३०६ रुपये प्रती किलो उच्चांकी भाव!

On

कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : देवगाव रंगारी येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत टोमॅटो खरेदी-विक्री लिलावाला प्रारंभ झाला आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी ५ हजार ६७८ कॅरेटची आवक झाली. सर्वप्रथम आलेले ताडपिंपळगाव (ता. कन्‍नड) येथील शेतकरी सादिक उस्मान शेख यांच्या शाहू वाणाच्या टोमॅटोला ३०६ रुपये प्रती किलो असा उच्चांकी भाव मिळाला.

WhatsAppImage2025-08-14at8.54.37AM

व्यापारी थेट शेतात जाऊन टोमॅटो खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नव्हता. त्‍यामुळे बाजार समितीने देवगाव रंगारी येथेच शेतमालाचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला. यंदा सोमवारपासून (११ ऑगस्ट) लिलावाला सुरुवात झाली. यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. सादिक शेख यांनी १८ कॅरेट (एका कॅरेटमध्ये २० किलो) टोमॅटोची विक्री केली. यातून त्यांना ८२ हजार ५३० रुपये मिळाल्याचे सांगण्यात आले.

देवगाव रंगारी येथील शेतकरी संतोष हिवाळे यांना २०१ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. त्यांनी ११ कॅरेट टोमॅटो विकले. नंतर दिवसभर सरासरी ५४ रुपये किलोचा भाव मिळाला. टोमॅटोची दररोज सरासरी १९ हजार ६७ कॅरेटपर्यंत आवक होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल देवगाव रंगारी उपबाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती डॉ. मनोज राठोड यांच्यासह संचालकांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : चारचाकी घेण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आण, अशी मागणी करून पतीसह सासरच्यांनी २२ वर्षीय विवाहितेचा छळ...
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
गंगापूर तालुक्‍यातही मतदार यादीत घोळ!; २० हजारांवर मतदारांबद्दल शंका? रांजणगाव शेणपुंजीच्या सरपंचांचे नाव चक्क ३ वेगवेगळ्या यादींत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software