‘गडबड’ करण्याच्या तयारीत आधीच पोलिसांनी पकडली मानगूट!; चेलीपुरा, सिडको, अन्‌ रेल्वेस्टेशन परिसरात रंगला पाठशिवणीचा खेळ

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांच्या मुसक्या पोलिसांनी त्‍यांनी काही गडबड करण्याच्या आधीच आवळल्‍या. वेदांतनगर, बेगमपुरा आणि सिटी चौक पोलिसांनी ही कारवाई केली. एकाकडे चाकू मिळून आला आहे.

-वेदांतनगर पोलिसांनी रेल्वेस्टेशनमधील रेल्वे क्वार्टरकडे जाणाऱ्या रोडवर आज, १३ ऑगस्‍टला पहाटे सव्वाच्या सुमारास कृष्णा सतीश अहिरे (वय २०, रा. आनंद बुद्ध विहाराजवळ, फुलेनगर) याला पकडले. तो अंधारात तोंडाला रुमाल बांधून उभा होता. पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी पकडून चौकशी केली असता त्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्‍याला अटक केली. त्‍याच्याविरुद्ध पोलीस अंमलदार कमलेश गुमरे यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-बेगमपुरा पोलिसांनी आज पहाटे दीडला उद्धवराव पाटील चौकात अंधारात लपलेल्या एकबाल शहा मलंग शहा (वय ३८, रा. शिवछत्रपतीनगर, रोजाबाग) याला पकडले. त्‍याच्याविरुद्ध पोलीस अंमलदार विश्वास शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पोलिसांनी पकडल्यावर अंधारात थांबण्याचे कारण विचारले. पण तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.
-सिटी चौक पोलिसांनी आज पहाटे सव्वाला चेलीपुरा चौकाजवळील ममता मिर्ची मसाल्याच्या दुकानासमोर इमरान खान सलावत खान (वय २५, रा. कैसर कॉलनी, मिनार मशिद गल्ली नं. २) याला पकडले. त्‍याच्याकडे चाकू मिळून आला. त्‍याला अटक करून सहायक फौजदार कल्याण मुगदल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software