बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात राडा; व्हिडीओ व्हायरल (पहा व्हिडीओ)

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दारूड्यांमुळे सतत अशांत राहणाऱ्या बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात बुधवारी (१३ ऑगस्ट) सकाळी पुन्हा राडा झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्‍यात दोन दारूड्यांना हॉटेलमधील कर्मचारी कपडे फाटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

पाणी बॉटल आणि पैशांच्या देवाण-घेवाणीवरून किरकोळ वाद झाल्यानंतर दारूड्यांना मारहाण सुरू झाल्याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. गेल्या काही दिवसांत महाराणा प्रताप चौकात दारूड्यांचा मुक्तसंचार अशांततेला कारणीभूत ठरत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शिवीगाळही अनेकदा दारूडे करत असतात. पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कन्‍नड (सीएससीएन वृत्तसेवा) : चारचाकी घेण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आण, अशी मागणी करून पतीसह सासरच्यांनी २२ वर्षीय विवाहितेचा छळ...
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
गंगापूर तालुक्‍यातही मतदार यादीत घोळ!; २० हजारांवर मतदारांबद्दल शंका? रांजणगाव शेणपुंजीच्या सरपंचांचे नाव चक्क ३ वेगवेगळ्या यादींत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software