टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

On

जालना (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव जीपचे टायर फुटून चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नालीत आदळली. यात छत्रपती संभाजनगरचे ११ जण जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावरील वडीगोद्रीजवळील शिवाजीनगरात (जि. जालना) बुधवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

सद्दाम पठाण (रा. मिसारवाडी), रितेश रतन गवळी (रा. भावसिंगपुरा), विलास शिंदे (रा. भावसिंगपुरा), शेख जुबैर, शैलेश सुखदेव प्रधान, धम्मा चिंतामण आठवले, अक्षय सुनील कामकर, सुभाष नामदेव वेलदोडे, अनुज वेलदोडे, नीलेश सुरेश भालतिलक, पवन प्रकाश पठाडे (सर्व, रा. उस्मानपुरा) अशी जखमींची नावे आहेत. ही वाद्यवृंद मंडळी बीड येथे एका कार्यक्रमासाठी जीपने (क्र. एमएच १४ डीव्ही ७७६६) जात होती. जखमींना आधी पाचोड ग्रामीण रुग्णालयात, नंतर चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील आठ रुग्णांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही

Latest News

प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही प्लॅन सिटी निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य; पालकमंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रालगत वाढत जाणारे औद्योगिक क्षेत्र, लोकसंख्या विचारात घेत महानगराचा नियोजनबद्ध विकास करावा...
५ लाखांसाठी २२ वर्षीय विवाहितेचा छळ, देवगाव रंगारी पोलिसांनी केला पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मरण समीप आले, अंतिम घटका मोजत असताना मध्ये उभे ठाकले २ देवदूत!; माणुसकी जपत युवकाला दिले जीवनदान, वाळूज महानगरात काय घडलं... पोलिसांनीही बजावलं कर्तव्य!!
मोठी बातमी : चौका येथे ढगफुटी; छ. संभाजीनगर-फुलंब्री महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू
मंत्री दादाजी भुसे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात अन्‌ अधिकाऱ्यांची उडाली धांदल!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software