माझ्या पत्‍नीसोबत का बोलतो म्‍हणत व्यापाऱ्याच्या डोक्‍यात घातला सिमेंटचा गट्टू!; सेंट्रल नाक्‍यावरील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माझ्या पत्‍नीसोबत का बोलतो असे म्‍हणून संतप्त युवकाने कपडे व्यापाऱ्याला बेदम मारहाण करत डोक्‍यात सिमेंटचा गट्टू घातला. यात व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी (१२ ऑगस्‍ट) हल्लेखोर युवकाविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

कपड्यांचे व्यापारी तौफीक बेग रफीक बेग (वय ३०, रा. न्यू नंदनवन कॉलनी प्लॉट नं. २८) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ५ ऑगस्टला सकाळी पावणेआठला ते मोटारसायकलीवर बसून सेंट्रल नाका येथील वडाच्या झाडाजवळ मित्राची वाट पाहत होते. त्यांचा जुना व्यवहारातील ओळखीचा राजू साखरे (रा. संभाजी कॉलनी एन ६ छत्रपती संभाजीनगर) हा आला.

त्‍याने तौफीक यांना विचारले, की तू माझ्या पत्नीसोबत का बोलतो? त्‍यावर तौफीक यांनी त्याला समजावून सांगू लागले. दोघांत वाद वाढून राजूने त्‍यांना शिवीगाळ करत हाताचापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. सिमेंट गट्टु त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तौफीक यांना मित्राने घाटी रुग्णालयात दाखल केले. त्‍यांच्या डोक्यात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. अधिक तपास पोलीस अंमलदार येडूबा तेलुरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software