शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक स्थळांवर चक्‍क ५६२२ भोंगे नियमबाह्य निघाले. ९६९ स्थळांना एका भोंग्‍याची अनुमती देण्यात आली आहे.

पोलीस आयुक्‍त प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली अत्‍यंत शांततेने ही मोहीम पार पाडली. जुलैमध्ये ही मोहीम राबवल्याचे सांगण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्‍त रत्‍नाकर नवले, विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी मोहिमेचे नेतृत्त्व केले. शहरात १०९३ मंदिरे, ५४५ मशिदी, १४९ बुद्धविहार, ४ गुरुद्वारा, ७४ दर्गा आणि ४१ चर्च आहेत. प्रार्थनास्थळांवर लाऊडस्पीकरसाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक असून, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वाजविण्याची परवानगी नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून भरधाव जीप नाल्यात आदळली, छ. संभाजीनगरचे ११ जण जखमी

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software