धक्कादायक : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून ४ शेतकऱ्यांची आत्‍महत्‍या!, १ जानेवारीपासून आजवर २२ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दीपक भागाजी वाघ (वय ४२, रा. शफियाबाद, ता. कन्नड), भगवान मारोती मोकासे (वय ५२, रा. पिशोर, ता. कन्नड), तायराम गणपतराव गवळे (वय ७०, रा. हळदा, ता. सिल्लोड), अजय ज्ञानेश्वर मगर (वय २५, रा. तांदूळवाडी, ता. गंगापूर) अशी आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. जिल्ह्यात १ जानेवारी ते २४ फेब्रुवारीदरम्यान तब्बल २२ शेतकऱ्यांनी आत्‍महत्‍या केल्या आहेत. मात्र सरकारकडून आत्‍महत्‍या रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत, की विरोधकांनाही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ मिळताना दिसत नाही.

घटना पहिली : पिशोर येथील भगवान मोकासे यांनी रविवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी १२ च्या सुमारास शेतात विष पिऊन आत्‍महत्‍या केली. गव्हाला फवारणीसाठी जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले होते. कर्जबाजारीपणा आणि खासगी देणीचा डोंगर वाढल्याने ते नैराश्यात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पिशोर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

घटना दुसरी : पिशोरजवळील शफियाबाद येथील अल्पभूधारक शेतकरी दीपक वाघ हे २१ फेब्रुवारीपासून घरातून निघून गेले होते. त्यांनी आर्थिक संकटामुळे गावातील विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्याचे सोमवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास समोर आले. त्यांच्यावर नातेवाइक व खासगी सावकारांचे कर्ज होते. मोठ्या मुलीच्या शिक्षण व लग्न करण्याची त्यांना काळजी होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पिशोर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

घटना तिसरी :  तांदूळवाडी येथील अजय ज्ञानेश्वर मगर यांनी रविवारी सायंकाळी गावाजवळील शेतात विष पिऊन आत्‍महत्‍या केली. सततच्या नापिकीमुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, चुलते असा परिवार आहे. गंगापूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
घटना चौथी : सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तायराम गवळे यांनी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास शेतातील वखारीत विष पिऊन आत्‍महत्‍या केली. त्यांच्यावर बडोदा बँकेसह बुलडाणा अर्बन बँकेचे कर्ज होते. नापिकीमुळे हप्ते थकले होते. कर्ज फेडण्याची त्यांना चिंता होती. या घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

Latest News

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू...
दुभाजकातून अचानक रस्त्यावर आलेल्या कारवर धडकली कार, चालकासह ५ महिला जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगीची घटना
दारू पिल्यानंतर वाद, मित्राने मित्राची दगडाने ठेचून केली हत्‍या!; पैठण तालुक्यातील बालानगर येथील खळबळजनक घटना
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसायात नफ्‍याच्या आमिषाने चौघांना ३८ लाखांचा गंडा!; व्यावसायिकासह ३ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software