दुभाजकातून अचानक रस्त्यावर आलेल्या कारवर धडकली कार, चालकासह ५ महिला जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगीची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुभाजकातून अचानक रस्त्यावर आलेल्या कारवर फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगर शहराकडे येणारी कार धडकली. यात कारमधील चालकासह ५ महिला जखमी झाल्या. त्यांना शहरातील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. ही घटना शहराजवळील सावंगी (हर्सूल) येथील विसावा हॉटेलसमोर मंगळवारी (२४ फेब्रुवारी) पहाटे एकच्या सुमारास (मध्यरात्री) घडली.

कारचालक मोहसीन फिरोज खान (वय ३२), प्रवासी महिला मनिषा विलास दीक्षित, कल्पना गिरीश गोयल, निर्मला रामराव साळवे, आशा व्यवहारे, मीना दगडू सोनवणे (सर्व रा. सिल्लोड) अशी जखमींची नावे आहेत. मोहसीन खान हे ३ वर्षांपासून शेख कलीम शेख चाँद (रा. सिल्लोड) यांच्या इर्टिका कारवर चालक आहेत. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास ते सिल्लोडहून महिला भाविकांना घेऊन कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाले होते.

छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री महामार्गाने शहराकडे येत असताना सावंगी शिवारातील विसावा हॉटेलसमोराल दुभाजकातून अचानक पांढरी स्विच व्ही.डी.आय. कार (MH 12 HZ 0866) अचानक मोहसीन यांच्या समोर रस्‍त्‍यावर आली. त्यामुळे मोहसीन यांची कार त्या कारवर धडकली. यात मोहसीन यांच्यासह भाविक महिला जखमी झाल्या. दोन्ही कारचेही मोठे नुकसान झाले. अपघात होताच दुसऱ्या कारचा चालक पळून गेला. मोहसीन यांच्या तक्रारीवरून त्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

Latest News

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू...
दुभाजकातून अचानक रस्त्यावर आलेल्या कारवर धडकली कार, चालकासह ५ महिला जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगीची घटना
दारू पिल्यानंतर वाद, मित्राने मित्राची दगडाने ठेचून केली हत्‍या!; पैठण तालुक्यातील बालानगर येथील खळबळजनक घटना
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसायात नफ्‍याच्या आमिषाने चौघांना ३८ लाखांचा गंडा!; व्यावसायिकासह ३ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software