सिल्लोडजवळ भीषण अपघात : ट्रकने अचानक ब्रेक लावले, मागून दुचाकी धडकली, दोघांचा जागीच मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ट्रकने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे मागून दुचाकी ट्रकवर आदळली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्‍यू झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील चिंचखेडा (ता. सिल्लोड) येथे सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

कैलास सखाराम मगर (वय ३७) व संजय बारीकराव खटाळ (वय ३८, दोघे रा. निल्लोड, ता. सिल्लोड) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. भवनच्या एका हॉटेलमध्ये मॅनेजर असलेले कैलास मगर आणि याच हॉटेलमध्ये वेटर असलेले संजय खटाळ हॉटेल बंद करून दुचाकीने घरी परतत होते. चिंचखेडा येथील एका हॉटेलजवळ समोर धावणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकी ट्रकला मागून धडकली. मगर यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आहे. खटाळ यांच्या पश्चात आई, पत्‍नी, दोन मुले असा परिवार आहे. दोघांवर मंगळवारी दुपारी दोनला अंत्‍यसंस्कार करण्यात आले. मगर यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. पुढील महिन्यात वास्‍तुशांती होती.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

Latest News

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू...
दुभाजकातून अचानक रस्त्यावर आलेल्या कारवर धडकली कार, चालकासह ५ महिला जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगीची घटना
दारू पिल्यानंतर वाद, मित्राने मित्राची दगडाने ठेचून केली हत्‍या!; पैठण तालुक्यातील बालानगर येथील खळबळजनक घटना
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसायात नफ्‍याच्या आमिषाने चौघांना ३८ लाखांचा गंडा!; व्यावसायिकासह ३ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software