- News
- जिल्हा न्यूज
- दारू पिल्यानंतर वाद, मित्राने मित्राची दगडाने ठेचून केली हत्या!; पैठण तालुक्यातील बालानगर येथील खळब...
दारू पिल्यानंतर वाद, मित्राने मित्राची दगडाने ठेचून केली हत्या!; पैठण तालुक्यातील बालानगर येथील खळबळजनक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण तालुक्यातील बालानगर येथे दारू पिल्यानंतर दोन मित्रांत वाद होऊन एकाने दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना सोमवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी सातला समोर आली. अहेमद जाफर पठाण (वय ८४, रा. बालानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, केशव छगन चव्हाण (रा. तांबे डोणगाव, ता. पैठण) असे मारेकऱ्याचे नाव आहे.
पोलीस चौकशीत समोर आला खून...
पोलिसांनी मृत्यूची चौकशी सुरू केली. त्यातून समोर आले, की २२ फेब्रुवारीला सायंकाळी सातच्या सुमारास अहेमद पठाण घरातून बाहेर पडले. केशव छगन चव्हाण (रा. तांबे डोणगाव, ता. पैठण) याच्यासोबत बालानगर- ढोरकीन रोडलगत युसूफ पठाण यांच्या शेतात दोघे दारू पिले. दारू पिताना त्यांच्यात काहीतरी वाद झाला. या वादातून केशव चव्हाणने अहेमद यांच्या यांच्या डाव्या भुवईच्यावर व डाव्या डोळ्याखाली दगडाने मारून गंभीर जखमी केले. यात अहेमद यांचा मृत्यू झाला. त्यावरून पोलिसांनी केशव चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
25 Feb 2026 17:58:23
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू...

