जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाच्याच्या गालात चापट मारल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मामावर पूर्ण कुटुंबानेच हल्ला चढवला. जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना पैठण तालुक्यातील नवगाव येथे १६ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. याप्रकरणात पैठण पोलिसांनी सोमवारी (२३ फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे.

अलीम वजीर शेख, सलीम वजीर शेख, तायरा वजीर शेख, अशू अलीम शेख (रा. नवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आप्पासाहेब पांडुरंग गवळी (वय ४०, रा. तुळजापूर, ता. पैठण) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते आई, वडील, पत्नी, बहीण व भावासह राहतात. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १६ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ च्या सुमारास ते घरी असताना त्यांचा भाचा अमोल भागवत जगताप घरी रडत आला. त्याने सांगितले, की काही कारण नसताना अलीम वजीर शेख (रा. नवगाव) याने माझ्या कानाखाली मारली. आप्पासाहेब व त्यांची आई पार्वती पांडुरंग गवळी हे अलीम शेख याच्या घरी जाब विचारण्यास गेले.

त्यांना पाहून अलीमने जातिवाचक शिवीगाळ केली. घराशेजारील सरपणातील लाकूड काढून त्याने आप्पासाहेबांच्या डोक्यात मारून दुखापत केली. त्यांची आई भांडण सोडवण्यास आली असता सलीम वजीर शेख, तायरा वजीर शेख, अशू अलीम शेख यांनी पार्वती गवळी यांना केस धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यात पार्वतीबाईंच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून पडली. तुझ्या घरात येऊन तुझा खून करू, अशी धमकी दिली. आप्पासाहेब, त्यांची आई, भाचा यांनी पैठणच्या सरकारी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचार घेतल्यानंतर पैठण पोलीस ठाण्यात आप्पासाहेबांनी येऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

Latest News

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन...
फुलंब्री पोलिसांकडून हॉटेल, लॉजेसची झाडाझडती!; दोन हॉटेलमध्ये आढळले ५ जोडपे!‌!
आक्षेपार्ह व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या!; खंडाळा येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
घरातून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा आढळला मृतदेह!; पैठण तालुक्यातील बालानगरची घटनेने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software