फुलंब्री पोलिसांकडून हॉटेल, लॉजेसची झाडाझडती!; दोन हॉटेलमध्ये आढळले ५ जोडपे!‌!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्री पोलिसांनी हॉटेल, लॉजेसची सोमवारी (२३ फेब्रुवारी) दुपारी झाडाझडती घेतली. दोन हॉटेलमध्ये कोणतीही नोंद न करता जोडप्यांना रूम उपलब्ध करून दिल्याचे आढळले. ५ जोडपे पोलिसांनी पकडले. या कारवाईने अशा पद्धतीने जोडप्यांना रूम उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल, लॉज मालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अंमलदार अनिल बिंदे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. सोमवारी (२३ फेब्रुवारी) दुपारी ३ च्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांनी सहकाऱ्यांसह मिळून फुलंब्री पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीतील हॉटेल व लॉजेसची तपासणी सुरू केली. हॉटेल पृथ्वीराज लॉजिंग व बोर्डिंग व हॉटेल ग्रिन पॅलेस खुलताबाद रोड फुलंब्री येथे भेट दिली. या दोन्ही हॉटेलमालक, व्यवस्थापकांनी हॉटेलमध्ये मुक्कामासाठी येणाऱ्या ग्राहकांची पडताळणी तर केलीच नाही, पण त्यांची नोंदही रजिस्टरमध्ये केलेली नव्हती.

हॉटेल पृथ्वीराजमध्ये रूम नंबर १ मध्ये २५ वर्षीय तरुण आणि ३० वर्षीय युवती आढळली. तरुण फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबाद वाडीचा तर तरुणी छत्रपती संभाजीनगरच्या छावणीची होती. रूम नंबर २ मध्ये भिन्नधर्मीय ४५ वर्षीय पुरुष व महिला आढळली. पुरुष सिल्लोडच्या माणिकनगरचा तर महिला छत्रपती संभाजीनगरच्या मिसारवाडीची निघाली. रूम नंबर ३ मध्ये खुलताबाद तालुक्‍यातील दरेगावचा ३० वर्षीय युवक आणि छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीची युवती मिळून आली. हॉटेल मॅनेजरने हॉटेलमध्ये प्रवेश करतेवेळी कोणत्याही कागदपत्राची मागणी केली नसल्याचे या जोडप्यांनीच सांगितले.

त्यानंतर बाजूच्या हॉटेल ग्रिन पॅलेसमध्ये पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा रूम क्रमांक १ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडीतील ४७ वर्षीय महिला आणि आंबेडकरनगरमधील ३० वर्षीय महिला मिळून आल्या. रूम नंबर २ मध्ये वाकोदचा ३८ वर्षीय युवक आणि हर्सूलची ३० वर्षीय महिला मिळून आली. रूम नंबर ३ मध्ये सिल्लोड तालुक्‍यातील पालोदचा २३ वर्षीय तरुण आणि छत्रपती संभाजीनगरच्या जयभवानीनगरातील २३ वर्षीय तरुणी मिळून आली. पोलिसांनी हॉटेल पृथ्वीराजचा मालक सागर कचरू गाडेकर (रा. गिरसावळी ता. फुलंब्री) व हॉटेल ग्रिन पॅलेसचा मालक रामेश्वर विठ्ठल बिंदे (रा. जांभई ता. फुलंब्री) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुनील सोनवणे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

Latest News

खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ खा. संदिपान भुमरे आणखी एका घोटाळ्याच्या चर्चेत!; चालक जावेद रसूल शेखवर आता दीडशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, अंबादास दानवे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खासदार संदिपान भुमरे पुन्हा एकदा घोटाळ्यांच्या चर्चेत अडकले आहेत. शहराजवळील जटवाडा- जोगवाडा भागातील जमीन...
फुलंब्री पोलिसांकडून हॉटेल, लॉजेसची झाडाझडती!; दोन हॉटेलमध्ये आढळले ५ जोडपे!‌!
आक्षेपार्ह व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या!; खंडाळा येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
जातिवाचक शिवीगाळ करत डोक्यात घातले लाकूड!; पैठण तालुक्यातील घटना
घरातून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा आढळला मृतदेह!; पैठण तालुक्यातील बालानगरची घटनेने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software