स्पॉट रिपोर्ट : अंभई दंगलप्रकरणी २०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १३ जणांना अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

अंभई, ता. सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अंभईतील दंगलीप्रकरणी अजिंठा पोलिसांनी २०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १३ जणांना अटक केली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. गावाला पोलिसांनी अक्षरशः वेढल्याने छावणीचे रुप प्राप्त झाले आहे. मंगळवारी (२४ फेब्रुवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास गावातील मुख्य चौकात शेळी आणि मटणाच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोन गटांत दंगल उसळली होती. यात दोन्हींकडून तुफान दगडफेक करून जमावाने १५ ते २० वाहनांची तोडफोड केली होती. दुकानांचेही मोठे नुकसान केले. यात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दंगलीला राजकीय किनारही लाभल्याची चर्चा आहे. भाजपकडून जिल्हा परिषद निवडून लढलेले त्र्यंबक गव्हाणे यांचा मुलगा विक्रम गव्हाणे हा दंगलीत गंभीर जखमी झाला आहे.

कशामुळे झाला वाद...
शाहरुख पठाण (रा. अंभई) याने गावातीलच कैलास मुंढेकडून शेळी विकत घेतली. या व्यवहारातून मंगळवारी दुपारी दोघांत वाद होऊन एकमेकांना त्यांनी मारहाणही केली होती. ग्रामस्थांनी वाद मिटवला. मात्र सायंकाळी नमाज झाल्यानंतर ७:३० च्या सुमारास बसस्थानक आणि बाजारपेठेत मोठा जमाव जमला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बाजूचा जमाव जमला. दोन्ही गटांत लाठ्याकाठ्यांनी हाणामारी सुरू झाली. तुफान दगडफेक सुरू झाली. यात दोन्ही गटांतील ७ जण गंभीर जखमी झाले. जमावाने सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. मात्र त्याआधीचे काही फूटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्याआधारे पोलिसांनी आज, २५ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवत १३ जणांच्या मुसक्या आवळल्या. १० मोटारसायकली जप्त केल्या.

दोन्ही गटांतील लोकांविरुद्ध गुन्हे दाखल
पोलीस अंमलदार सांडू जाधव यांच्या तक्रारीवरून  शाहरुख जफर पठाण, सलमान अहमद पठाण, शाहरुख अहमद पठाण, बाबा जफर पठाण, रिझवान मुबारक शहा, सय्यद अरबाज अय्युब, आजिम जाफर पठाण, इरशाद शकूर खान, बबलू अली शहा, शाहरुख बाबू शहा, मोबीन कदीर पठाण, एजाज अय्युब पठाण, रमजान नसीरखा पठाण, शेरू युनूस पठाण (सर्व रा.अंभई) आणि दुसऱ्या गटातील धनराज भगवान मुंढे, कैलास भगवान मुंढे, कैलास रुपचंद मुंढे, अजय मोहनसिंग मुंढे, समाधान देवराव सपकाळ, रामसेन चव्हाण, विक्रम त्र्यंबक गव्हाणे, राहुल भगवान ढगे, सागर भगवान ढगे, कैलास रतन शिमरे, अभिजीत धनराज मुंढे, गुरुप्रसाद कैलास बावस्कर (सर्व रा. अंभई) यांच्यासह एकूण २०६ लोकांविरुद्ध दंगलीचे गुन्हे अजिंठा पोलिसांनी दाखल केले आहेत. दंगलीमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून, महिला, मुलांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले.

जमावाला पांगविण्यासाठी केला होता लाठीमार...
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे रवींद्र ठाकरे, सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी अंभईत रात्री दाखल झाला होता. त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला होता. दंगलीतील नुकसान लाखोंच्या घरात आहे. अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

Latest News

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू...
दुभाजकातून अचानक रस्त्यावर आलेल्या कारवर धडकली कार, चालकासह ५ महिला जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगीची घटना
दारू पिल्यानंतर वाद, मित्राने मित्राची दगडाने ठेचून केली हत्‍या!; पैठण तालुक्यातील बालानगर येथील खळबळजनक घटना
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसायात नफ्‍याच्या आमिषाने चौघांना ३८ लाखांचा गंडा!; व्यावसायिकासह ३ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software