छत्रपती संभाजीनगरात ओरिसावरून येतोय गांजा!; तिघा तस्करांना अटक, १६ लाखांची कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ओरिसावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजा आणणणाऱ्या तिघांच्या मुसक्या शहर गुन्हे शाखेने आवळल्‍या आहेत. त्यांच्याकडून पावणेपाच किलो गांजा, ट्रक, मोबाइल, रोकड असा सुमारे १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई  छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करोडी शिवारात चामुंडा एंटरप्रायजेसमध्ये करण्यात आली.

शेख मोहम्मद खालीद शेख नईम (रा. सादातनगर, सातारा परिसर), शेख अकील शेख सलीम (रा. जहागीरदार कॉलनी, रेल्वे स्टेशन, राजीवनगर) आणि मोहम्मद मन्सूर शेख (रा. सादातनगर, सातारा परिसर) पकडण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अकील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याला ऑगस्ट २०२४ मध्ये दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. ऑगस्ट २०२६ पर्यंत हद्दपार असतानाही तो शहरात आल्याचे समोर आले.

पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांना गोपनीय माहिती मिळाली, की चामुंडा इंटरप्रायजेस येथे माल घेऊन आलेल्या ट्रकमध्ये गांजा आहे. त्यानुसार पोलिसांनी करोडी शिवारात छापा मारला. तेथे ट्रकची (एमएच १७ बीवाय ६९७४) झडती घेतली. चालकाच्या सिटमागील बॉक्समध्ये ४ किलो ८७३ ग्रॅम गांजा सापडला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस अंमलदार संदीप तायडे, कैलास काकड, योगेश नवसारे, राहुल बंगाळे, अमोल मुगळे, शेख जुनेद, अक्षय नाटकर, सागर साळवे, तातेराव शिनगारे, दादासाहेब झारगड यांनी केली. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

Latest News

काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार काय ही फसवणुकीची तऱ्हा!;  नोकरी, मोफत दुचाकीचे आमिष दाखवून १२ हून अधिक महिलांना गंडवले!, कागदपत्रे घेऊन उचलले लाखा रुपयांचे कर्ज, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : संस्थेचे सभासद झाल्यानंतर नोकरी व मोफत इलेक्ट्रीक दुचाकी देण्यात येईल, असे आमिष दाखवून गरजू...
दुभाजकातून अचानक रस्त्यावर आलेल्या कारवर धडकली कार, चालकासह ५ महिला जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगीची घटना
दारू पिल्यानंतर वाद, मित्राने मित्राची दगडाने ठेचून केली हत्‍या!; पैठण तालुक्यातील बालानगर येथील खळबळजनक घटना
सिडको एन ८ मध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यवसायात नफ्‍याच्या आमिषाने चौघांना ३८ लाखांचा गंडा!; व्यावसायिकासह ३ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software