राठोड, काळे, चव्हाण अन्‌ मुलतानी... सोयगावच्या दोन गटांत रंगली राजकीय वारसांमध्ये लढाई!; मतदार कोणाच्या पाठिशी राहणार?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, जिल्ह्याचे लक्ष मराठवाडा आणि खानदेशच्या उंबरठ्यावर असलेल्या सोयगाव तालुक्यातील दोन गटांकडे लागले आहे. याचे कारण म्हणजे येथील आमखेडा आणि फर्दापूर या दोन गटांत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबांतील वारसांची लढाई होत आहे. उमेदवारांच्या पाठीशी उभ्या असलेल्या नेत्यांनीही निवडणुकीत स्वतःला झोकून दिल्याचे दिसत आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या राजेंद्र राठोड यांची कन्या मोनाली पवार आमखेडा गटातून मैदानात उतरल्या आहेत. त्यांची लढाई भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते बाबुराव काळे यांच्या स्नुषा पुष्प काळे यांच्याशी होत आहे. २५ हजार ९३४ मतदार असलेल्या या मतदारसंघात आता या वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारतो, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. फर्दापूर गटात शिंदे गटाचे नेते आणि सिल्लोड बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण यांच्या पत्नी प्रभावती चव्हाण निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या कन्या माहीन मुलतानी यांच्याशी लढा द्यावा लागणार आहे. या दोन्हींपैकी कुणाच्या पाठीशी आता या गटातील ३१ हजार ३३ मतदार उभे राहतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

कुटुंब रंगलंय प्रचारात
निवडणुकीच्या निमित्ताने सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार, राजेंद्र राठोड, प्रभाकर काळे, भाजपचे सुरेश बनकर, सुनील गव्हांडे आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही गटांतील उमेदवारांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे नातेवाइक असे सारेच प्रचारार्थ पायपीट करताना दिसत आहेत. कुटुंबाचा प्रभाव आणि स्थानिक राजकीय समीकरणे जुळविण्यात हे सर्वच रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...

Latest News

वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत... वडगाव कोल्हाटी : भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली, प्रकरण पोलिसांपर्यंत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे....
सोन्याचा नेकलेस गायब झाला कसा?, वृद्ध दाम्‍पत्‍य हैराण, मोलकरणीचे हात वर, उस्मानपुऱ्यात हे घडलं काय...
अल्पवयीन मुलाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी, वडगाव कोल्हाटीतील घटना, कठोर भूमिका घेण्याऐवजी पोलिसांनी घटना ठरवली अदखलपात्र!
वाळूज एमआयडीसीतील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिक्षक जुंपले प्रचाराला!; व्हिडीओ व्हायरल
अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच!; २६ वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत प्रियकराने ठेवले जबरस्ती शारीरिक संबंध!; २० व्या दिवशी तिला घेऊन वाळूज MIDC पोलिसांत झाला हजर, मग तिने चांगलेच ‘अडकवले’!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software