प्रवासी बसत असतानाच बस पुढे नेल्याने महिला पडली,चालकाला मारहाण, वाहतुकीचा खोळंबा, फुलंब्री तालुक्‍यातील आळंदमध्ये घडलं काय...

On

फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील आळंद (ता.  फुलंब्री) येथे मलकापूर-पुणे बसच्या चालकाने प्रवासी बसत असतानाच बस पुढे नेण्याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे महिला प्रवासी पाय घसरून पडली. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी चालकाला मारहाण केली. या वेळी बस रस्त्यातच थांबल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला. वडोद बाजार पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन बस बाजूला घेतली. त्‍यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत २ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्‍या. ही घटना मंगळवारी दुपारी (१२ ऑगस्ट) घडली.

एसटी बस (क्र. एमएच ४० एक्यू ६१७९) आळंद बसस्थानकावर थांबल्यानंतर प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी केली. छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी निघालेल्या सुनिता काशीनाथ परसुदे (वय ५०, रा. आळंद) या बसमध्ये चढण्याची घाई करू लागल्या. त्याचवेळी चालकाने बस पुढे नेली. त्‍यामुळे त्‍या घसरून चाकाजवळ पडल्या. सुदैवाने नागरिकांनी तत्काळ त्यांना बाजूला ओढले. त्‍यामुळे जीव वाचला. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी बसचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीमुळे बस रस्त्यातच थांबली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. ग्रामस्थांनी चालकाला बस बाजूला घेण्यास सांगितले असता तो मला मारहाण करणाऱ्यांना आधी हजर करा, असे म्हणू लागला. त्‍यामुळे वाहतूक कोंडी वाढत गेली. २ किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली. तासभर गोंधळ सुरू होता. अखेर वडोद बाजार पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर आणि सहकाऱ्यांनी रस्त्यावरील बसला बाजूला घेतली व वाहतूक सुरळीत केली. आळंद येथे बस नियमित थांबत नाहीत. त्‍यामुळे थांबलेल्या एखाद्या बसमध्ये चढण्यासाठी एकच धांदल उडते. त्‍यातून असा प्रकार घडतो. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!

Latest News

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे! शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...
पैठणमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर!; तब्‍बल २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी!!
छ. संभाजीनगरात चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांवर कारवाई; साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली हॉटेलचालकांची बैठक, म्हणाले, अल्पफायद्यासाठी कुणाच्या आरोग्याशी खेळू नका!
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software