चंपा चौक- जालना रोड रस्‍त्‍याची मोजणी पूर्ण, २ आठवड्यांनी होईल मार्किंग, नंतर नोटिसा देऊन पाडापाडी!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चंपा चौक ते जालना रोड या रस्‍त्‍याच्या रूंदीकरणात बाधित होणाऱ्या मालमत्तांची मोजणी सोमवारी (११ ऑगस्ट) आणि मंगळवारी (१२ ऑगस्ट) महापालिकेच्या नगररचना विभागाने केली. हा रस्ता ३० मीटरचा असून, सुमारे १६०० मालमत्ता बाधित होणार आहेत. मोजणीला कुणीही विरोध केला नाही. मंगळवारी सायंकाळी मोजणी पूर्ण झाली. आता पुढील प्रक्रिया भूमी अभिलेख विभाग करणार आहे. रस्त्याची एकूण लांबी १८०० मीटर म्हणजे ६ हजार फूट असल्याचे या मोजणीअंती समोर आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जालना रोडकडे येण्यासाठी हा तिसरा पर्यायी रस्ता आहे, जो पंचायत समिती कार्यालयापासून (दमडी महल) चंपा चौकापर्यंत १०० फूट रूंद आहे. पुढे रस्त्याची रूंदी हळूहळू कमी होऊन जुना मोंढा येथे चक्क रस्ता बंद झाला आहे.  वाहनांना आठवडे बाजारमार्गे मोंढा नाका येथे यावे लागते. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी हा रस्ता करण्याचा निर्णय घेतला असून, यापूर्वी त्‍यांनी अतिक्रमणधारकांशी चर्चाही केली आहे. खोत-पाटील एजन्सीच्या मदतीने आता मोजणी (टोटल सर्व्हे स्टेशन) केल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. मोजणीचा अहवाल भूमी अभिलेख विभागाकडे देण्यात येईल. त्‍यांनी ठरवून दिल्यानुसार महापालिकेकडून मार्किंग करण्यात येईल. या प्रक्रियेला दोन आठवडे लागण्याची शक्‍यता आहे. मार्किंगनंतर नोटिसा देऊन अतिक्रमणे काढून घेण्यासाठी वेळ देण्यात येईल. नंतर प्रत्‍यक्ष पाडापाडी केली जाईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!

Latest News

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे! शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...
पैठणमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर!; तब्‍बल २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी!!
छ. संभाजीनगरात चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांवर कारवाई; साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली हॉटेलचालकांची बैठक, म्हणाले, अल्पफायद्यासाठी कुणाच्या आरोग्याशी खेळू नका!
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software