विद्यादीप बालगृहातून मुलींच्या पलायनाला बाल कल्याण समिती जबाबदार, शासनाने समिती केली बरखास्त!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यादीप बालसुधारगृहातील असुविधा आणि छळामुळे ९ मुलींनी ३० जूनला आक्रमक होत सिनेस्‍टाइल पलायन केले होते. या घटनेला बाल कल्याण समितीचे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचे समोर आले होते. अखेर शासनाने जिल्हा बाल कल्याण समिती सोमवारी (११ ऑगस्ट) बरखास्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाल कल्याण समितीचा अतिरिक्त कार्यभार परभणीच्या समितीकडे सोपविण्यात आला आहे.

१ जून २०२५ रोजी जिल्हा बालकल्याण समितीची मुदत संपली होती. मात्र शासनाने समिती अध्यक्ष व सदस्यांना नवीन समितीच्या नियुक्तीपर्यंत मुदतवाढ दिली होती. विद्यादीप बालगृहातील गैरप्रकार आणि मुलींवर होणाऱ्या अत्‍याचारांकडे बाल कल्याण समितीने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर आले होते. शासनाने नेमलेल्या चौकशी समितीनेही बालकल्याण समितीवर ठपका ठेवला. मुलींच्या पलायनाचे प्रकरण समितीला योग्य प्रकारे हाताळता आले नाही. त्‍यामुळे शासनाने समितीला दिलेली मुदतवाढ रद्द केली आहे. जालना, बीड आणि जळगाव जिल्हा बालकल्याण समिती सध्या निलंबित असून, आता छत्रपती संभाजीनगर बाल कल्याण समितीही बरखास्त केली आहे.

घटनेची पार्श्वभूमी…
क्रूर वागणूक आणि छळाला कंटाळून विद्यादीप बालसुधारगृहातून एकाचवेळी ९ अल्पवयीन मुलींनी ३० जूनला सकाळी पलायन केले होते. बालसुधारगृहातील लाइट फोडून हातांवर जखमा करून घेत दगड, चाकू, लोखंडी रॉड हाती घेऊन त्‍या पळत सुटल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. छावणी पोलिसांसह दामिनी पथकाने जिल्हा न्यायालयासमोर ५ तर रेल्वेस्थानक परिसरात २ मुलींना ताब्‍यात घेतले होते. २ मुली पळून जाण्यात यशस्वी झाल्या होत्‍या. त्‍यातील एक मुलगी स्वतःच्या घरी गेली होती. ती नंतर आईसह बालकल्याण समितीसमोर आली. नववी मुलगी ४ दिवसांच्या शोधानंतर शुक्रवारी शिवाजीनगरमध्ये मिळून आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!

Latest News

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे! शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...
पैठणमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर!; तब्‍बल २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी!!
छ. संभाजीनगरात चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांवर कारवाई; साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली हॉटेलचालकांची बैठक, म्हणाले, अल्पफायद्यासाठी कुणाच्या आरोग्याशी खेळू नका!
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software