मैत्रिण म्हणाली, गोली मार के बता... त्यानं खरंच झाडली गोळी!; किल्लेअर्कचा थरार, घरातूनच पोलिसांनी आवळल्या तेजाच्या मुसक्या!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल सय्यद एजाज ऊर्फ तेजा हा ११ ऑगस्ट रोजी २५ वर्षीय मैत्रिण राखी मुरमुरे (वय २५) हिच्यासोबत किल्लेअर्कच्या घरात होता. रात्री ९ च्या सुमारास राखीने तेजाजवळील चार्जिंगला लावलेला मोबाइल मागितला. त्याने शिवीगाळ करत नकार दिला. त्यावरून वाद होत त्याने गोळी मारण्याची धमकी दिली. मैत्रिणीने त्याला गोली मार के बता असे म्हणताच तेजाने गोळी झाडली. जी तिच्या उजव्या हातात घुसली. तेजाच्या आईने तिला रुग्णालयात नेले...

तेजाविरुद्ध तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात अमली पदार्थांच्या तस्करीसह लुटमार, विनयभंग, हत्येच्या प्रयत्नांचा समावेश आहे. त्‍याला शहर गुन्हे शाखेने सोमवारी (११ ऑगस्ट) रात्री घरातून अटक केली. मंगळवारी (१२ ऑगस्ट) त्याला घटनास्थळी पंचनाम्यासाठी नेले होते. न्यायालयाने त्याला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. टीव्ही सेंटर परिसरात रिक्षाचालकामागे कोयता घेऊन धावत दहशत माजवल्याप्रकरणी पोलिसांनी तेजाला ५ एप्रिलला अटक केली होती. ११ दिवसांपूर्वी तो हर्सूल कारागृहातून जामिनावर बाहेर आला. त्याचे पूर्ण कुटुंब ड्रग्‍जतस्करीत लिप्त आहे. त्याची आई रेश्मा, मेव्हणा सोहेल करीम सय्यद उर्फ सोनू मनसे हेही जामिनावर सुटले आहेत. गोळीबार झाला तेव्हा हेही घरातच होते, असे तपासात समोर येत आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!

Latest News

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे! शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...
पैठणमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर!; तब्‍बल २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी!!
छ. संभाजीनगरात चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांवर कारवाई; साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली हॉटेलचालकांची बैठक, म्हणाले, अल्पफायद्यासाठी कुणाच्या आरोग्याशी खेळू नका!
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software