- News
- सिटी क्राईम
- वाळूज MIDC हादरली : गादीत बांधून नेत होते २० वर्षीय तरुणीचा मृतदेह; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे बिंग...
वाळूज MIDC हादरली : गादीत बांधून नेत होते २० वर्षीय तरुणीचा मृतदेह; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटले!; सावत्र आई-वडील म्हणाले, आत्महत्या..., मात्र घातपाताची दाट शक्यता!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील तिसगाव चौफुलीजवळ नंदिनी राजू धिवरे (वय २०, रा. वडगाव कोल्हाटी, ता. छत्रपती संभाजीनगर) या तरुणीचा गादीत संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (१९ फेब्रुवारी) रात्री १० च्या सुमारास समोर आला. पोलिसांनी सावत्र आई भारती उमेश साबळे (वय ३५) व वडील उमेश गोविंद साबळे (वय ४०, रा. वडगाव कोल्हाटी) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
ज्या पद्धतीने दाम्पत्य मृतदेह नेत होते आणि त्या आधीही त्यांनी त्याबाबत कुठे नोंद केलेली नसल्याने संशय बळावला आहे. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, नंदिनी काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह करून वडगाव कोल्हाटी येथे रूम भाड्याने करून राहत होती, असे समोर येत आहे. हा प्रकार खरंच आत्महत्या आहे की घातपात हे चौकशीनंतरच समोर येणार आहे.

