फुलंब्रीत जनावरांच्या वाहतुकीवरून पोलीस- गोरक्षकांमध्ये जोरदार वादावादी, पोलिसांनी गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप

वाहन जाळून तोडफोडीचा प्रयत्‍न झाल्याचा पोलिसांचा आरोप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  समृद्धी महामार्गाजवळील हर्सूल सावंगी शिवारात जनावरे घेऊन जाणारे वाहन अडविल्याच्या कारणावरून फुलंब्री पोलीस आणि गोरक्षकांत वाद झाला. पोलिसांनी गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे.  त्‍यामुळे मंगळवारी (१७ फेब्रुवारी) मध्यरात्रीपासून बुधवारी (१८ फेब्रुवारी) पहाटे साडेचारपर्यंत फुलंब्री पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त केले असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, समृद्धी महामार्गाजवळील सावंगी शिवारात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास काही गोरक्षकांनी जनावरांची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो (क्र. एमएच २० ईजी ४९४५) रोखला. त्याची माहिती ‘११२' क्रमांकावर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक संजय सहाणे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. गोरक्षकांनी वाहन अडविताच ते जागेवरच सोडून चालक फरारी झाला. वाहनातील सात बैल सुखरूपपणे गोशाळेत पाठविण्यात आले असून, वाहन जप्त करण्यात आले आहे. या वेळी वाहन पकडल्याच्या कारणावरून गोरक्षक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

या वेळी गोरक्षक वाहन जाळण्याचा व तोडफोड करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना रोखले असता त्यांनी पोलिसांनाच शिवीगाळ केली. पोलिसांनी कोणालाही मारहाण केली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सहाणे यांनी दिली. दुसरीकडे पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप गोरक्षकांनी केला आहे. या झटापटीत गणेश शेळके, पवन जंजाळ व ओम घोडके हे जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आमदार संजय  केणेकर मध्यरात्री पोलीस ठाण्यात
घटनेची माहिती मिळताच मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भाजपचे आमदार संजय केणेकर कार्यकर्त्यांससह पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी गोरक्षकांच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याने पोलीस आणि समर्थकांमध्ये तीव्र वाद तसेच आरोप- प्रत्यारोप झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयातही बैठक झाली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पिकअप वाहनाच्या चालक व मालकाविरुद्ध बुधवारी रात्री दहा वाजता पशु संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप

Latest News

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत,...
मुलीला कॉल केल्यावरून तरुणाला बेल्टने बेदम मारहाण, आधी कॉलेजमध्ये नंतर रूममध्ये घुसून हल्ला, सिडकोतील घटना
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
गोळीबार करून पोलिसांशी पंगा घेणाऱ्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का'ची कारवाई; छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्‍तांचे कठोर पाऊल
फुलंब्रीत जनावरांच्या वाहतुकीवरून पोलीस- गोरक्षकांमध्ये जोरदार वादावादी, पोलिसांनी गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software