छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप

सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचा आक्षेप ठाकरे सेनेचे पराभूत उमेदवार तांगडेंनी केली तक्रार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत, तोच भाजपचे प्रभाग क्रमांक १० (क) मधील नुतन नगरसेवक गणेश रामजीवन नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नावंदर यांनी सिडकोच्या नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याची आणि सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचा आक्षेप मनपा निवडणुकीत ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार रवींद्र तांगडे यांनी दाखल केला आहे. यावर आता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात तक्रारदार रवींद्र तांगडे यांनी आक्षेप दाखल केला आहे की,  नावंदर यांनी एन-५ सिडको येथील शॉपलेट भूखंड क्र. १ आणि १ (अ) वर केवळ तळमजल्याची परवानगी असताना ‘जी+२' असे अनधिकृत बांधकाम केले आहे. इतकेच नव्हे तर, इमारतीवर अनधिकृत मोबाइल टॉवर उभारला असून इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या सरकारी नाल्यावर आणि आरक्षित बगिच्याच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार तांगडे यांनी केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ड) नुसार नावंदर यांचे पद रद्द करावे, अशी मागणी करणारे निवेदन मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे.

प्रतिज्ञापत्रावर शिक्का नसल्याचा आक्षेप
हे प्रकरण अनधिकृत बांधकामापुरते मर्यादित नसून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. उमेदवारी अर्जासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र नोटरीकृत असूनही त्यावर ‘अॅफिडेव्हिट' चा अधिकृत शिक्का नसल्याचा आरोप आहे. छाननीच्या दिवशी ३१ डिसेंबर २०२५ रोजी नियमानुसार उमेदवारांचे अर्ज सार्वजनिक करणे बंधनकारक असताना निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी तसे केले नसल्याचा दावा केला. यासंदर्भात प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले असून सत्ताधारी भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप

Latest News

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत,...
मुलीला कॉल केल्यावरून तरुणाला बेल्टने बेदम मारहाण, आधी कॉलेजमध्ये नंतर रूममध्ये घुसून हल्ला, सिडकोतील घटना
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
गोळीबार करून पोलिसांशी पंगा घेणाऱ्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का'ची कारवाई; छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्‍तांचे कठोर पाऊल
फुलंब्रीत जनावरांच्या वाहतुकीवरून पोलीस- गोरक्षकांमध्ये जोरदार वादावादी, पोलिसांनी गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software