दोन दारूड्यांनी पोलिसांच्या पोटात लगावले ठोसे, वर्दीवर दारू फेकून केली अश्लील शिवीगाळ!; शिवाजीनगरातील धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिवाजीनगरातील क्रिस्टल वाईन शॉपसमोर धिंगाणा घालणाऱ्या दोन दारूड्यांनी पोलिसांच्या पोटात ठोसे लगावले. वर्दीवर दारू फेकून अश्लील शिवीगाळ करत धमक्या दिल्या. हा खळबळजनक प्रकार सोमवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी ६ च्या घडली.

सुनील श्यामराव धनेधर (रा. इंदिरानगर) रोहित भानुदास इंगळे (रा. इंदिरानगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार प्रशांत एकनाथ नरोडे (वय ३७) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. सोमवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी ६ च्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून डायल ११२ वाहनासह पोलीस अंमलदार अमोल आहेर, विनोद गायकवाड, प्रशांत नरोडे आणि होमगार्ड राजेश पवार हे शिवाजीनगरातील क्रिस्टल वाईन शॉपसमोर आले. शॉपसमोर सुनील आणि रोहित हे दारू पिऊन धिंगाणा घालत होते.

पोलिसांनी त्यांना येथे दारू पिऊ नका, असे सांगितले. त्यावर दोघांनीही अरेरावी करून अश्लील शिवीगाळ केली. सुनिलने तो पित असलेली दारू पोलिसांच्या अंगावर फेकून तुला काय करायचे ते कर, मी तुला दाखवतो, असे म्हणाला. रोहितने पोलिसांच्या पोटात ठोसे लगावले. तुम्हाला जीवंत सोडणार नाही, बघा आता मी काय करतो, असे धमकावले. पोलिसांनी बळाचा वापर करून दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले आणि गुन्हा दाखल केला आहे. अटक करून दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली.
दारूड्यांचा कहर...
शिवाजीनगरातील या क्रिस्टल वाइन शॉपसमोर कायम दारूड्यांचा धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे नागरिक त्रस्‍त झाले आहेत. अनेकांना वाहनधारकांना अडवून दारूडे लूटमार करत असतात. आता तर त्यांनी थेट पोलिसांनाच ठोसे लगावल्याने आता तरी पोलीस याकडे लक्ष देऊन कठोर उपाययोजना करतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!

Latest News

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद! नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहरातील कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक...
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
वाळूज एमआयडीसीतील तरुणीच्या हत्याकांडाचे गूढ उकलले!; प्रेमविवाह, पुन्हा दुसरे नाते, संतापलेल्या आईनेच घोटला लेकीचा गळा
सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास
पीएसआयने आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत केली मारहाण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software