पीएसआयने आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत केली मारहाण

फुलंब्री ठाण्यातील प्रकरण; मी आधी गोरक्षक असल्याचे सांगत घातला धिंगाणा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  आपण आधी गोरक्षक असल्याचे सांगत शहर पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटोदकर याने फुलंब्री ठाण्याबाहेर आपल्याच सहकारी पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकावले. अश्लील तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून गोरक्षकांच्या जमावाला पोलिसांच्या घरी जाऊन दगडफेकीच्या चिथावणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

१८ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या या प्रकरणात फुलंब्रीचे पोलिस अंमलदार अनिल घुसिंगे यांनी तक्रार देत गोरक्षक गणेश अप्पासाहेब शेळके, सुरज कैलास जाधव, उपनिरीक्षक पाटोदकरवर गुन्हा दाखल केला. सावंगी शिवारात मंगळवारी रात्री ९ वाजता गोरक्षकांनी जनावरांची वाहतुकीचे वाहन अडवून पोलिसांना कळवले. निरीक्षक सहाणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. कारवाईत हस्तक्षेप करू नका, अशी समज पोलिसांनी गोरक्षकांना दिली. शेळके व इतरांनी मात्र पोलिसांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. 'तुम्ही माझ्यावर यापूर्वी गुन्हा का दाखल केला', असे म्हणत पिकअप व्हॅनची पोलिसांसमक्ष तोडफोड करून पेट्रोलने पेटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

साध्या वेशातील उपनिरीक्षक आक्रमक
पोलिसांनी बळाचा वापर करुन शेळके व अन्य गोरक्षकांना ताब्यात घेऊन फुलंब्री ठाण्यात नेले. मात्र त्यानंतर ठाण्याबाहेर १५० ते २०० जणांचा जमाव जमला. त्या जमावात पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटोदकर साध्या वेशात होता. 'मी आधी गोरक्षक आहे', असे म्हणत त्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांची नोकरी घालवण्याची धमकी दिली.

आयुक्तांनी केले तडकाफडकी निलंबित
पोलिस उपनिरीक्षक पाटोदकर पूर्वी चिकलठाणा पोलिस ठाण्यात कार्यरत असतानाही वादग्रस्त ठरला होता. काही महिन्यांपूर्वी त्याची शहर पोलिस दलात बदली होऊन थेट गुन्हे शाखेत वर्णी लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. बुधवारच्या फुलंब्रीतील या धक्कादायक घटनेनंतर पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. गुन्हा दाखल होताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनेची गंभीर दखल घेत त्याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश जारी केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!

Latest News

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद! नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहरातील कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक...
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
वाळूज एमआयडीसीतील तरुणीच्या हत्याकांडाचे गूढ उकलले!; प्रेमविवाह, पुन्हा दुसरे नाते, संतापलेल्या आईनेच घोटला लेकीचा गळा
सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास
पीएसआयने आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत केली मारहाण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software