नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!

गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमधून केली अटक, दोन साथीदारही अटकेत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहरातील कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक (३२, रा. रवींद्रनगर) हा नेपाळमधून परत येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यासोबत अन्य दोन साथीदार दाऊद मुनावर पठाण (२८, रा. बायजीपुरा) व सरफराज मिर्झा हाफिज बेग (२७, रा. शहाबाजार) यांनाही गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे ३:०० वाजता नाशिक शहरातील एका लॉजच्या खोलीतून जेरबंद केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी लातूर, उदगीरमधून शहरात नशेच्या पातळ औषधांचा साठा घेऊन येणाऱ्या तस्करांना गुन्हे शाखेने अटक केली होती. यात १५ दिवस सलग तपास करुन रॅकेटमधील १८ साथीदारांना अटक केली. या सर्वांचा म्होरक्या अश्पाक त्याच रात्रीतून शहरातून पसार झाला होता. अजमेर, इंदूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, नेपाळपर्यंत जाऊन लपला. तेथून तो नुकताच परत आला बुधवारी रात्री गुप्त बातमीदाराने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना संपर्क करून अश्पाक नाशिकमध्ये लपल्याची माहिती दिली. पवार यांनी नाशिकचे पोलिस आयुक्त कर्णिक यांच्याशी संपर्क करून शहर पोलिसांची टीम त्यांच्या मदतीसाठी पाठवली.

या टीमने मध्यरात्री नाशिकमध्ये अश्पाक, दाऊद, सरफराज वडाळा नाक्यावरील हॉटेल सॅफरॉनमध्ये थांबले होते. अश्पाक नेहमी शस्त्र बाळगत असल्याने नाशिक पोलिस आयुक्त संदीप कनिक यांनी गुन्हे शाखा, क्युआरटीचे जवान मदतीसाठी पाठवले. पोलिसांनी बळाचा वापर करून पहाटे तिघांच्या मुसक्या आवळल्या. मोहिम फत्ते होईपर्यंत आयुक्त पवार गुन्हे शाखा व नाशिक पोलिसांच्या संपर्कात होते. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त अशोक राजपूत, पोनि. गजानन कल्याणकर, अर्जुन कदम, प्रवीण वाघ, श्रीकांत काळे, विजय निकम, राजेश यदमळ, विक्रम खंडागळे, जालिंदर गोरे, राहुल बंगाळे, अभिषेक बाठे यांच्यासह आर्दीनी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

अश्पाकची होती सर्वत्र दहशत
अशपाकची गुन्हेगारी वृत्ती विकृत स्वरूपाची होती.  त्याच्या दहशतीमुळे अनेक जण त्याच्याविरुद्ध उघडपणे बोलण्यास धजावत नव्हते. पण आता त्याचे हळूहळू एक एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान अशपाक पटेल हा केवळ ड्रग्ज माफिया नसून त्याला शहरातील काही राजकीय कार्यकर्त्यांचेही छुपे पाठबळ लाभल्याचे समोर आले आहे. तो फरार असतानाही शहरातील काही राजकीय कार्यकर्ते त्याच्या संपर्कात होते. धक्कादायक बाब म्हणजे, हे कार्यकर्ते अशपाकला फोन करून शहरातील पोलिसांच्या हालचालींची इत्थंभूत माहिती देत होते. पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आहे. आरोपीला मदत करणाऱ्या त्या बडया नेत्यांचा आता पोलीस शोध घेणार आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!

Latest News

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद! नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहरातील कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक...
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
वाळूज एमआयडीसीतील तरुणीच्या हत्याकांडाचे गूढ उकलले!; प्रेमविवाह, पुन्हा दुसरे नाते, संतापलेल्या आईनेच घोटला लेकीचा गळा
सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास
पीएसआयने आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत केली मारहाण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software