- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
शिवजयंती मिरवणुकीत अनेक ठिकाणी हाणामारी; ७५ मोबाइल, २० महिलांचे मंगळसूत्रेही लंपास
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. परंतु काही ठिकाणी या मिरवणुकीला वादाचे तसेच चोरीच्या घटनांचे गालबोट लागले. क्रांती चौक परिसरात मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले असून, चाकू हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
शिवजयंती मिरवणुकीत झालेल्या अलोट गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ करून घेतला. क्रांती चौक परिसरातून तब्बल ७० ते ८० मोबाइल आणि जवळवास २० महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे लंपास करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दुचाकी, मंगळसूत्र आणि मोबाइल चोरीच्या संशयावरून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. गर्दीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असूनही चोरांनी घातलेल्या धुमाकूळामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
By District Correspondent
सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास
By District Correspondent
पीएसआयने आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत केली मारहाण
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप
By District Correspondent
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
By District Correspondent
अजिंठा लेणी पहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला!; ७ जपानी नागरिकांसह ४० जखमी
By District Correspondent
Latest News
20 Feb 2026 14:50:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहरातील कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक...

