सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास

मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून सांगितली जाचाची आपबिती; मोबाइल पोलिसांनी केला जप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : निसर्गाची साथ नाही, जमिनीत काही पिकत नाही या बिकट परिस्थितीत आणि सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जफेडीसाठी होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. जरंडी (ता.सोयगाव) येथे ही धक्कादायक घटना घडली. मृत्यूपूर्वी शेतकऱ्याने चिठ्ठीत सावकाराच्या त्रासाची आपबितीच लिहून ठेवली आहे.  त्यात पोलिसांनी आपल्याला न्याय द्यावा, अशी विनवणी केली आहे. दत्तात्रय रघुनाथ मुठे (६१, रा. जरंडी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय मुठे यांची जरंडी शिवारात दोन एकर शेती होती. शेती मशागत आणि पेरणीसाठी त्यांनी बँका आणि खासगी सावकारी कर्ज रक्कम असे एकूण पाच लाख रुपये कर्ज घेतले होते. परंतु खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी त्यांना वारंवार फोनवर त्रास व धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे वैतागून अल्पभूधारक शेतकऱ्याने घरातील पत्राच्या शेडमध्ये गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृताच्या खिशात सापडलेली चिठ्ठी व मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
शेतकऱ्याचे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ. शैलेश खंदारे यांनी शवविच्छेदन केले. नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी पाच वाजता मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत दत्तात्रय यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, अजय कोळी, गजानन दांडगे आदी करत आहेत.

चिट्ठीत शेतकऱ्याने मांडलेली व्यथा
मे. पोलिस अधिकारी साहेब सोयगाव, मी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याचे मी व्याज, मुद्दल देत आलो. दरवर्षी व्याजपोटी चारपट पैसे दिले. पैसे फिटत नाही. सावकाराने मला दररोज फोन करून परेशान केले आहे. मी माझी चार एकर जमीन विकली तेव्हा पैसे दिले. आता माझ्याजवळ दोन एकर जमीन आहे. सावकाराचे म्हणणे आहे की जमीन विकून पैसे दे. मी माझ्या मुलाबाळांना काय देऊ? मला या लोकांनी त्रस्त करून टाकले आहे. तरी मी आत्महत्या करत आहे. ही चिट्ठी पोलिस अधिकाऱ्यांना देणे. पोलिस अधिकारी साहेबांनी माझ्या कुटंबीयांना मदत करावी.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!

Latest News

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद! नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहरातील कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक...
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
वाळूज एमआयडीसीतील तरुणीच्या हत्याकांडाचे गूढ उकलले!; प्रेमविवाह, पुन्हा दुसरे नाते, संतापलेल्या आईनेच घोटला लेकीचा गळा
सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास
पीएसआयने आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत केली मारहाण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software