- News
- जिल्हा न्यूज
- अजिंठा लेणी पहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला!; ७ जपानी नागरिकांसह ४० जखमी
अजिंठा लेणी पहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला!; ७ जपानी नागरिकांसह ४० जखमी
बचावासाठी पर्यटकांना घ्यावा लागला स्वच्छतागृहाचा आधार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिवजयंतीसह वीकेंडच्या सुट्या असल्याने सध्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच बुधवारी (दि.१८) सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक जोरदार हल्ला चढवला. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात ७ जपानी पर्यटकांसह विद्यार्थी व नागरिक असे एकूण ४० जण जखमी झाले. मधमाशांपासून बचावासाठी नागरिकांना शेवटी स्वच्छतागृहांचा आधार घ्यावा लागला. हल्ल्यात जखमी जपानच्या ७पर्यटकांसह इतरांवर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
गेल्या वर्षभरात मधमाशांनी १० वेळा पर्यटकांवर हल्ले केले आहेत. यात शेकडो पर्यटक जखमी झाले आहेत. याआधी मधमाशांनी १६ जपानी पर्यटकांवरही हल्ला केला. यातील ७ पर्यटक जखमी झाले. तसेच घनसावंगी तालुक्यातून सहलीसाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांवरही मधमाशांनी हल्ला केल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक असे १० जण जखमी झाले. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर काही दिवस पर्यटकांची संख्या रोडावते. खबरदारी म्हणून १० गतवर्षी भारतीय पुरातत्त्व विभागाने वन विभागाचे पुणे येथील पथक बोलावून लेणी परिसरातील मधमाशांचे अनेक पोळ हटवले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
By District Correspondent
अजिंठा लेणी पहायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला!; ७ जपानी नागरिकांसह ४० जखमी
By District Correspondent
महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे अब्दुल समीर साजेद
By City News Desk
अचानक टायर फुटले; भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने तरुण व्यापाऱ्याने गमावला जीव
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ‘बुलेटराजां’वर कारवाईचा दणका
By District Correspondent
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच ६३७ ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार
By District Correspondent
डीजे चालकांना पोलिस प्रशासनाची तंबी : कामे घ्याल तर डीजे जप्त करून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
By District Correspondent
खुलताबाद तालुक्यात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला विहिरीत; रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे बेतले जीवावर
By District Correspondent
Latest News
19 Feb 2026 14:47:47
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत,...

