बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास

सोयगाव पोलिसांनी घेतले तीन चोरटे ताब्यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या मोठ्या ५ दिवसीय यात्रेत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत १५ महिलांचे तब्बल १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी ३ संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

बनोटी येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणारी ही यात्रा सोयगाव, सिल्लोड, कन्नड तालुक्यासह खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. यात महिला भाविकांची संख्या मोठी आहे. परंतु याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र आणि सोन्याची चैन यावर डल्ला मारला. यात्रेत आलेल्या महिला भाविक वैष्णवी जाधव, संजना चौधरी, पूनम कोलते, मयुरी चव्हाण, वैशाली शिंदे, दीपाली पाटील, संजीवनी पवार, देवका जाधव, शीतल राठोड, जयश्री पाटील, भकीबाई अहिरे, कोमल सोनवणे, निकिता घुले, त्रिशिका मगर आणि अंजली पवार या महिलांनी त्यांचे ३ ते ६ ग्रॅमपर्यंतचे दागिने गमावले आहेत. या घटनेमुळे यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून ३ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक गजानन बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन आरके, जमादार राजू बरडे, एन. एस. खोडे आणि संदीप सुसर हे पुढील तपास करीत आहेत.

अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, बुधवारी याप्रकरणी त्रिशिका कुणाल मगर (वय २५ वर्षे, रा. पहुरी ता. सोयगाव) यांनी सोयगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांच्या गळ्यातील साडे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात महिलेने पळविली. त्रिशिका यांनी आरडाओरडा केल्यानंतर सदरील चोर महिला पळून गेली. याप्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप

Latest News

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत,...
मुलीला कॉल केल्यावरून तरुणाला बेल्टने बेदम मारहाण, आधी कॉलेजमध्ये नंतर रूममध्ये घुसून हल्ला, सिडकोतील घटना
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
गोळीबार करून पोलिसांशी पंगा घेणाऱ्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का'ची कारवाई; छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्‍तांचे कठोर पाऊल
फुलंब्रीत जनावरांच्या वाहतुकीवरून पोलीस- गोरक्षकांमध्ये जोरदार वादावादी, पोलिसांनी गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software