मुलीला कॉल केल्यावरून तरुणाला बेल्टने बेदम मारहाण, आधी कॉलेजमध्ये नंतर रूममध्ये घुसून हल्ला, सिडकोतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुलीला कॉल केल्यावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सिडकोतील देवगिरी बँकेजवळ बुधवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी अडीचच्‍या सुमारास घडली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णा बाबासाहेब सोनवणे (वय २४, रा. मूळ गाव डोंगरगाव ता. सिल्लोड) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो सध्या सिडकोतील देवगिरी बँकेच्या बाजूला म्हाडा एच.आय.जी. वसाहतीत मित्र सरफराज देशमुख व गोविंद बजाज यांच्यासोबत दोन वर्षांपासून रूम करून किरायाने राहतो. तो एलएलबीच्या तिसऱ्या वर्षात एमजीएममध्ये शिकतो. सोमवारी (१६ फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास तो रूमवर येत असताना अभय सोमवंशीचा फोन आला. तो म्हणाला, की तू तन्वीला (नाव बदलले आहे) फोन का केला. तू मला एमजीएम गेट नंबर ५ समोर येऊन भेट. तेव्हा कृष्णा गेट नं. ५ समोर गेला. तेव्हा अभय सोमवंशी व त्याच्यासोबत दिग्वीजय आगळे भेटले.

त्यांनी तन्वीला फोन केल्याच्या कारणावरून कृष्णासोबत वाद घालून शिवीगाळ करत हाताचापटाने मारहाण केली. त्यानंतर ते दोघे तिथून निघून गेले. कृष्णा रूमवर आला. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास कृष्णा एमजीएम कॉलेजमध्ये असताना अभयने फोन केला. आपण वाद मिटवू, तू मला भेट, असे म्हटला. त्यावर कृष्णाने संध्याकाळी भेटतो, असे सांगितले. त्यामुळे अभयने त्याला फोनवर शिवीगाळ केली. तू मला जर भेटला नाही तर मी तुला दाखवतो, अशी धमकी दिली. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास कृष्णा व त्याचा मित्र गोविंद बजाज रूममध्ये असताना रूमसमोर दिग्वीजय आगळे व त्याच्यासोबत अनोळखी दोघे आले.

त्यांनी रूमबाहेर खाली बोलावले. त्यांना कृष्णाने नकार दिला असता ते रूमच्या दरवाजावर लाथा मारून आत आले. दिग्वीजय व दोन अनोळखी व्यक्तींनी कृष्णाला शिवीगाळ करून रुममध्ये ओढले व हाताचापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले.  दिग्वीजयने कमरेच्या बेल्टने पाठीवर मारले. सर्वांनी मिळून झाडूने, लाकडी फ्रेमने मारहाण करून जखमी केले. जीवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कृष्णाने सिडको पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी अभय सोमवंशी, दिग्वीजय आगळे आणि अनोळखी  दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विमल पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!

Latest News

नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद! नेपाळवारी करून परतलेला छत्रपती संभाजीनगरचा कुख्यात ड्रग्ज माफिया जेरबंद!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहरातील कुख्यात ड्रग्ज स्मगलर शेख अश्पाक शेख इसाक...
छत्रपती संभाजीनगरात मिरवणुकीत नाचण्यावरून चाकूहल्ला, दोन जण जखमी
वाळूज एमआयडीसीतील तरुणीच्या हत्याकांडाचे गूढ उकलले!; प्रेमविवाह, पुन्हा दुसरे नाते, संतापलेल्या आईनेच घोटला लेकीचा गळा
सावकाराच्या जाचाला कंटाळून जरंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतला गळफास
पीएसआयने आपल्याच सहकाऱ्यांना शिवीगाळ करत केली मारहाण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software