स्वतःचे हात-पाय बांधून घेतला गळफास!; माजी नगरसेवक, बिल्डर राजू तनवाणी यांचा मुलगा दीपेशच्या आत्‍महत्‍येने छ. संभाजीनगर हादरले!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी नगरसेवक, बांधकाम व्यावसायिक राजू तनवाणी यांचा मुलगा दीपेश तनवाणी (वय २६) याने उस्मानपुऱ्यातील अमृतसाई एकदंत अपार्टमेंटमधील ४०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. मंगळवारी (१२ ऑगस्ट) सकाळी ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. आय एम नॉट अंडर प्रेशर. धिस इज माय फॉल्ट ओन्ली, आय एम सॉरी... अशी इंग्रजी भाषेतील सुसाइड नोट पोलिसांना मिळून आली. पाय बांधलेले असल्याने सुरुवातीला शंका निर्माण झाली होती. मात्र, फ्लॅटचा मुख्य दरवाजा, बेडरूम आतून लॉक होते. शिवाय मुख्य दरवाजाला डिजिटल लॉक असून केवळ दीपेशचेच बोटांचे ठसे त्यावर आढळले. त्यामुळे ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दीपेशने विदेशातून एमबीएची पदवी घेतली आहे. कोरोना काळात शहरात परतल्यानंतर तो कौटुंबिक व्यवसायात सक्रिय झाला होता. आई-वडिलांसह मछलीखडक परिसरात राहत होता. तीन महिन्यांपूर्वी तो अमृतसाई एकदंत अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहायला आला होता. सोमवारी दिवसभर व मंगळवारी सकाळपर्यंत वारंवार कुटुंबीय त्याला कॉल करत होते. मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांनी अपार्टमेंटकडे धाव घेतली. डकमधून गॅलरीत प्रवेश करून बेडरूमची खिडकी तोडल्यानंतर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सहायक पोलीस आयुक्त डॉ. रणजित पाटील, उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. फॉरेन्सिक तज्‍ज्ञांकडून पंचनामा करून मृतदेह फासावरून काढून उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.

दीपेशने गळफास घेण्यासाठी नवा दोर आणला. आधी स्वतःचे दोन्ही पाय बांधले, नंतर दोरीत दोन्ही हातांचे मनगट अडकवून टेबलवर उभा राहिला आणि सिलिंग फॅनला गळफास घेतल्‍याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सोमवारी दिवसभरात कधीतरी त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी त्याने शेंद्र्याच्या साइटच्या हिशेबाच्या रजिस्टरमध्ये इंग्रजीमध्ये सुसाइड नोट लिहून बेडवर ठेवली होती. त्यात लिहिले की, सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल माफ करा. तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, याबद्दल मला खूप खंत आहे. मी जो असायला हवा होतो, तसा मी राहू शकलो नाही, ही माझी चूक आहे. यात कुणाचाही दोष नाही. फक्‍त माझा आहे. मी सगळ्यांना त्रास दिला. कुणालाही आनंदी ठेवू शकलो नाही. फक्‍त दुःख दिलं, ही माझी चूक आहे. माफ करा. आय लव्ह यू... असे नमूद केले आहे. त्याने चार वेळेस आय एम सॉरी लिहिले आहे.

सुसाइड नोट व मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास उस्मानपुरा पोलीस करत आहेत. दीपेश राखीपौर्णिमेला घरी गेला होता. फ्‍लॅटवर परतल्यानंतर सोमवारी सकाळी आईला त्‍याने कॉल केला. नंतर कॉलला प्रतिसाद दिला नाही. सोमवारी सकाळी १०.३० च्या च्या सुमारास बॅटरी संपल्याने मोबाईल स्विच ऑफ झाला. राजू तनवाणी यांना दोन मुली व दीपेश हा एकुलता एक मुलगा होता. एक मुलगी अमेरिकेत तर दुसरी दुबईत राहते. दीपेश वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. अमृतसाई एकदंत अपार्टमेंट ही त्‍याच्या वडिलांनी भागीदारीत बांधलेली आहे. दीपेश त्यातल्या ४०३ क्रमांकाच्या थ्री बीएचके फ्‍लॅटमध्ये राहत होता. आत्‍महत्‍येपूर्वी त्‍यानेचेहराही एका कपड्याने झाकून घेतला होता. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!

Latest News

शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे! शहर पोलिसांनी उतरवले १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहर पोलिसांनी महिनाभरात शहरातील १९०६ प्रार्थनास्थळांवरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवले आहेत. ९३७ मोठ्या धार्मिक...
पैठणमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा घोळ समोर!; तब्‍बल २५ हजार मतदारांची नावे दोन ठिकाणी!!
छ. संभाजीनगरात चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांवर कारवाई; साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली हॉटेलचालकांची बैठक, म्हणाले, अल्पफायद्यासाठी कुणाच्या आरोग्याशी खेळू नका!
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजवंदन!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software